आपला बीड जिल्हा

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

वादळवार्ता वार्तांकन – केज

शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिना निमित्त केज शहर शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

गुरुवार दि.१७ नोव्हेंबर रोजी स्वर्गीय उद्धव ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिना निमित्त केज तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मराठवाडा संपर्क नेते माननीय चंद्रकांत खैरे साहेब संपर्क प्रमुख धोंडू दादा पाटील, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली व केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या प्रेरणेने केज शहर प्रमुख तात्या रोडे यांच्या आयोजनाखाली केज शिवसेना संपर्क कार्यालयात स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. त्या निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिपक बप्पा मोराळे, विधानसभा प्रमुख अशोक जाधव, जिल्हा सहसंघटक अभिमान बापू पटाईत, विधानसभा सरचिटणीस महाराना घोळवे, युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, महिला आघाडी तालुका प्रमुख अश्विनी बडे, तालुका समन्वयक सुधिर जाधव, तालुका सचिव रामहरी कोल्हे, दिपक नाईकवाडे, युवा सेना विधानसभा प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, उपतालुका प्रमुख अभिजीत घाटुळ, सुनील पटाईत, उपशहर प्रमुख पपु ढगे, शेख जाहेद, वाहतूक सेना शहर प्रमुख अमोल चौधरी, किरण बडे, राहुल फुके यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!