केज MSEB च्या पाठपुराव्याला यश
वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
केज शहरातील तथा तालुक्यातील विद्युत वितरण करणारी MSEB केज च्या कार्यालयामध्ये विद्युत वितरण व्यवस्थापन करणेसाठी 5 MVA चा ट्रान्सफार्म बसविण्यात आला होता . त्यामुळे केज शहरात तथा तालुक्यात विज पुरवठा करणे शक्य नव्हते. म्हणुन कांही भागातील किंवा गावातील विज पुरवठा खंडीत करुन ज्या ठिकाणी वीज नाही त्याठिकाणी विज पुरवली जायची मात्र केज येथील MSEB चे प्रभारी उपकार्यकारी अभियंता नामदेव सुतार व कनिष्ट अभियंता अंर्डिल साहेब यांच्या प्रयत्नामुळे केज शहराचा तसेच तालक्यातील विज वितरण करणेसाठी 10 MVA चा रोहित्र ट्रान्सफॉर्म केज येथील MSEB मध्ये दाखल झाला आहे .
सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे कर्मचारी तथा स्टाफ असिस्टन शेख मकसुद त्याबरोबर ऑपरेटर नागेश राऊत यांच्या वतीने रोहित्र बसविण्याचे काम सुरु असुन केज शहरातील विज पुरवठा दर दोन तासांनी देण्यात येणार आहे.
केज शहरातील विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवस लागनार आहेत . असे मत MSEB चे प्रभारी उपकार्यकारी अभियंता नामदेव सुतार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!