अपघातआपला बीड जिल्हा

साळेगावच्या पुलावर पुन्हा अपघात ! : रस्त्यावरील साईन बोर्डला धडकून एक जखमी

वादळवार्ता – गौतम बचुटे

केज-कळंब रोडवर साळेगांव जवळच्या पुलाचे दुरूस्तीचे काम सुरू असलेल्या पुलावर पुन्हा अपघात झाला असून एकजण जखमी झाला आहे.

केज-कळंब दरम्यान साळेगांव येथील तेलंग आणि आरडकर यांच्या शेताजवळ असलेल्या महमार्ग क्र. ५४८-सी या रस्त्यावर पुलाची दुरुस्ती सुरू आहे. दि. ८ ऑगस्ट मंगळवार रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास त्या ठिकाणी मेल कंपणीने लावलेले सूचना फलक अंधारात न दिसल्याने परळीकडून केज मार्गे कळंबकडे मोटार सायकल क्र. (एम एच ४४/ ए ए २१२८) वरून जात असलेले मेजर विष्णू गोविंद आघाव वय (५० वर्ष) (रा. परळी जि. बीड) हे त्या बोर्डला धडकले. या अपघात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून मोटार सायकलीचेही नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती भैय्या घाटूळे यांना मिळताच त्याने अपघातस्थळी हजर होत ही माहिती पत्रकार गौतम बचुटे यांना दिली. त्या नंतर पत्रकार गौतम बचुटे, बलभीम बचुटे, डॉ. संजीत पाखरे, रवी बचुटे, जय जोगदंड आणि यश बचुटे हे तात्काळ अपघातस्थळी हजर झाले. त्यांनी पोलिस आणि १०८ क्र. च्या अँबुलन्सला संपर्क साधला. त्या नंतर अँबुलन्स उपलब्ध होताच अँबुलन्स चालक आदमाने यांच्या मदतीने जखमी अवस्थेतील विष्णू आघाव यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.

अपघाताला मेलचा गलथानपणाच कारणीभूत ! :-या रस्त्यावर आज पर्यंत झालेले अपघात आणि जिवीत हानी ही मेल (मेगा इंजिनीअर अँड इन्फ्रास्ट्रुक्चर मर्या.) या कंपनीने केलेले सदोष काम यामुळे अपघात झालेले आहेत. दि. ६ ऑगस्ट रोजी या पुलावरील लोखंडी चॅनेल तुटून वर आल्यामुळे पोलीस आणि नागरिकांनी रात्रभर जागून अपघात टाळण्यासाठी परिश्रम घेतले होते. त्या नंतर दि. ८ ऑगस्ट रोजी संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी पूल दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पण रस्ता दुरुस्ती सुरू असताना रात्रीच्या वेळी वाहचलक याना स्पष्ट दिसेल; असे रेडीयम किंवा प्रकाश व्यवस्था असणारे सूचना फलक न लावता केवळ मातीचे ढिगारे आडवे टाकले आहेत. तसेच अत्यंत तकलादू व अंधारात न दिसणारे सूचना फलक लावले असल्याने पुन्हा त्या ठिकाणी आजचा अपघात झाला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!