आपला बीड जिल्हाविशेष

क्रिकेटर ते यशस्वी युवा उद्योजक व्यंकटेश पापा मुंडे 

वादळवार्तापरळी वैज्यनाथ

व्यवसाय करीत असताना नम्रता, शिष्टाचार, राहणीमान आदी गोष्टींचं कौशल्य असल्याशिवाय यशस्वी उद्योजक होणे नाही. उद्योजक होण्यासाठी बाजारपेठेतील स्पर्धा आदींची माहिती उद्योजकाला असणे आवश्यक आहे. या सर्वच गुणांचा संगम असलेले व्यंकटेश पापा मुंडे आजच्या तरुण उद्योजकांना आदर्श निर्माण करणारे आहेत. परळी शहरातील भेल सेकंडरी स्कूलमध्ये व्यंकटेश पापा मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर शहरातीलच वैद्यनाथ महाविद्यालय पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले त्यानंतर त्यांनी विद्यापीठातून बीबीए पदवी पूर्ण ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सुद्धा ग्रामीण भागासाठी काहीतरी करता येते हे त्यांच्या कार्यातून ठळक जाणवते. लहानपणापासूनच क्रिकेटची त्यांना आवड होती. शहरातील कोणत्याही क्रिकेट स्पर्धा असोत त्यामध्ये त्यांची क्रिकेट बद्दलची ओढ लक्षात येत असेल. एक प्रकारे क्रिकेटर ते यशस्वी उद्योजक असे थोडक्यात वेंकटेश बाबा मुंडे यांचे वर्णन करता येईल. शहरात बुलेट शोरूम आणि टाटा मोटर्स आदी शोरूम कंपनीची यशस्वी उभारणी त्यांनी केली यामुळे ग्राहकांना मोठ्या महानगरात जाऊन खरेदी करण्याची गरज नाही .ती गरज त्यांनी परळी येथे शहरात केली आहे. तसेच सेव्हन फिटनेस जीम त्यांनी तरुणांच्या आरोग्याच्या व फिटनेसच्या बाबतीत सुरू केले आहे. त्यांचा नेहमीच परळी शहरातील व जिल्ह्यातील, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नवीन नवीन व्यवसाय आणण्याचा प्रयत्न असतो. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी चिकाटीपणा आणि जिद्द आवश्यक असते चिकाटीपणा आणि जिद्द या शब्दाचा प्रतिशब्द म्हणजे शहरातील तरुण उद्योजक मुंडे होय. घरातून कोणीही उद्योजक नसताना या क्षेत्राकडे त्यांनी पाऊल ठेवला आणि कुटुंबातील सदस्यांचा कायम पाठिंबा त्यांच्यासोबत राहिला आहे त्यांच्याच पाठिंब्याने आणि स्वतःच्या कौशल्याने आज त्यांनी उद्योजक म्हणून आपला ठसा उमटविला आहे. जागतिकीकरणाच्या धोरणामुळे आणि खासगीकरणाच्या वाढत्या गरजेमुळे नोकरी मिळविणे कठीण झाले असताना, अनेक बेरोजगार हातांना काम देण्याचे कार्य व्यंकटेश पापा मुंडे यांच्याकडून होत आहे. त्यांनी काम करण्यापेक्षा अनेकांना काम लावले हे उद्दिष्ट साध्य केले आहे. उद्या उभारत असताना चढउतारा होत असतो . मागणी आणि पुरवठा यामध्ये चढउतार झाल्यामुळे आर्थिक हानी होऊ शकते परंतु अशाही परिस्थितीत न डगमगता त्यांनी यशस्वी उद्योग केला. अनेकांच्या हाताला काम दिल्यामुळे अनेक बेरोजगारांचा पोटापाण्याचा प्रश्न या माध्यमातून त्यांनी पूर्ण केला आहे. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. अतिशय कठीण परिस्थितीत उद्योग उभारून त्यांनी तो यशस्वी करून दाखविला आहे .नाही तरी उद्योग जोमाने उभारला जातो मात्र पुढील काळात तो टिकेलच याची शाश्वती राहत नाही मात्र याला व्यंकटेश पापा मुंडे हे अपवाद ठरतात. शहरातील तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न मिटला पाहिजे या हेतूने त्यांनी विचार केला. कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्थचे सचिव व्यंकटेश (पापा) मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

प्रदिप खाडे   

अध्यक्ष : कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्था

सहसचिव : नाथ शिक्षण संस्था, परळी वैजनाथ

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!