आपला बीड जिल्हाआपले केज

साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे उसतोड कामगारांच्या मुलां – मुलिंचे वार्षिक स्नेहसंमेलन सपन्न…

कथक नृत्याने , टिंगु डान्सने प्रेक्षकांची मने जिंकली

वादळवार्ता – केज

बीड जिल्हा उसतोड कामगार विकास मंडळ केज संचालित जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणारे साने गुरुजी निवासी प्रा.मा. उच्च माध्यमिक विद्यालय केज येथे उसतोड कामगारांच्या मुला-मुलींचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.

प्रस्तावीक गित्ते मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचे उद्घाटक नंदकिशोर मुंदडा तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन नगराध्यक्ष सिता बन्सोड मॅडम होत्या.

तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन पशुपतीनाथ दांगट, हारुण इनामदार , सुरेशतात्या पाटील , डॉ.वासुदेव नेहरकर गटशिक्षण अधिकारी सुनिल केंद्रे, रमाकांत मंडे , भगवान केदार , मराठी पत्रकार परिषदेचे जि. उपाध्यक्ष विजय आरकडे सक्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी , आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे , डिजीटल मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष रामदास तपसे, गौतम बचुटे, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष रंजित घाडगे , राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय भांगे , पत्रकार मुबशिर खतीब , पत्रकार साजेद इनामदार आदि मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन छोट्याश्या रोपट्याला पाणी देऊन करण्यात आले .

त्यानंतर मान्यवरांचा स्वागताचा कार्यक्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष उध्वराव कराड यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रस्तावीक शाळेच्या मुख्याध्यापिका गित्ते मॅडम यांनी केले. या प्रसंगी नंदकिशोर मुंदडा , हारुण इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त केली तर अध्यक्षिय भाषण सिता बन्सोड मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कथक नृत्य सादर करण्यासाठी आलेल्या विद्यार्थांनी कथक नृत्य तसेच टिंगु डॉन्स सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर तथा सांस्कृतिक गाण्यावर अप्रतिम नृत्य , नाटक , मुलाखत आश्या विविध कला सादर केल्या . या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन सिरसट .एस .एल मॅडम यांनी केले तर आभार शेख .आर . व्ही . यांनी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांदे मॅडम , डोंगरे मॅडम , नागरगोजे मॅडम , लहाने मॅडम पाटोळे सर , भांगे सर , चाटे सर , काळे सर , सानप सर , घुले सर , मोती सर , इनामदार सर , तरकसे सर , दस्तुरे सर आदि शाळेतील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!