वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
पीक विम्याची अग्रीम आणि इतर मगण्यासाठी शेलगाव गांजी येथील शेतकऱ्यांनी साळेगांव येथे केज- कळंब रोडवर गांजी पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन केले.
या बाबतची माहिती अशी की, शेलगाव गांजी या गावाचा समावेश युसुफवडगाव महसूल मंडळात असून अग्रीम पीक विम्या पासून वंचित राहिले आहे. या परिसरात सोयाबीन व कापसावर मोठ्या प्रमाणात रोगराई पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याच बरोबर यलो मोझॅक आणि गोगलगायीमुळे सुद्धा नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. शेगलाव गांजी शिवारातील पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच शेलगाव गांजी या गावाचा समावेश गोटेगाव सज्जा ऐवजी साळेगांव तलाठी सज्जात करावा. सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षातील सोयाबीन व कापसाची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी बन्सी जाधव, श्रीहरी जाधव, लक्ष्मण आकुसकर, उद्धव जाधव आणि सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि. ३० सप्टेंबर रोजी साळेगांव येथे केज- कळंब रोडवर गांजी फाट्यावर रास्ता शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी भागवत पवार तलाठी इनामदार, कृषी पर्यवेक्षक येवले, कृषी सहाय्यक कमलाकर राऊत यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून वरिष्ठांना अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने बिट जमादार राजू गुंजाळ, पोलिस जमादार देवकते, पोलीस नाईक बजरंग इंगोले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
या आंदोलनात विठ्ठल पटणे, सुरेश साखरे, नामदेव जाधव, रामराजे जाधव, श्रीकृष्ण जाधव, धिरज जाधव, बालाजी जाधव, प्रशांत वाळके, बापूराव पटणे, शिवदास पटणे, श्रीकृष्ण जाधव, दिगंबर पटणे, मुरलीधर जाधव, रमेश जाधव, विजयकुमार जाधव, शिवाजी जाधव, बालासाहेब जाधव, व्यंकटी पटणे, दत्तात्रय खंडागळे, रघुनाथ जाधव, प्रशांत वाळके, लक्ष्मीकांत जाधव, बालाजी जाधव, अशोक जाधव, लिंबाजी जाधव, विष्णू कापरे, जगन्नाथ पटणे, बापूराव जाधव, शुभम जाधव, बळीराम साखरे, राजाभाऊ साखरे, नारायण साखरे, गोवर्धन पटणे, श्रीकिसन पटणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!