वादळवार्ता – बीड
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) बीड अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या अमलबजावणीसाठी दि. २५ ते २७ मार्च २०२३ पर्यंत आयोजित “नवतेजस्विनी महोत्सव २०२३” अंतर्गत स्वयंसहाय्य महिला बचतगट उत्पादित वस्तू चे विक्री – प्रदर्शनाचा यशस्वी समारोप समारंभ दि २७ मार्च ३०२३ रोजी झाला. यावेळी प्रमूख अतिथी म्हणुन कृषी विभागाचे मा. बाबासाहेब जेजुरकर (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी), श्री तांबाळे, ( तांत्रिक कृषी अधिकारी), मनिषाताई तोकले (सामाजिक कार्यकर्त्या) , रेखाताई वेडे (अध्यक्ष – जिल्हा सुकाणू समिती), तत्वशिल कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) , एस बी चिंचोलीकर (जिल्हा समन्वय अधिकारी, माविम ) , सी आर मुंजेवार (लेखाधिकारी, माविम) उपस्थित होते.
यावेळी सहभागी स्टॉल धारक बचतगटांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात आव्हान केले. यानंतर तालुकास्तरीय प्रदर्शन व जनजागृती साठी माविम व कृषि विभागाच्या संयुक्तं विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे सांगितले.
तसेच महिलांच्या आरोग्य व सकस आहाराबाबत सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई तोकले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महीला चे आरोग्य तपासणी करण्यात आली.
या तीन दिवसीय प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे मसाले, पापड, लोणचे, पेढा, खवा, तेल, शोभेच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, धान्य, कडधान्य, खारेमुरे, भाजीपाला, खाद्य पदार्थ इत्यादि स्टॉल ला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविम जिल्हा समन्वय अधिकारी एस बी चिंचोलीकर यांनी केले, तर आभाप्रदर्शन वैशाली नाईकनवरे यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीएमआरसी कार्यकारीणी व मॅनेजर सविता औटे, उषा राठोड, वैशाली नाईकनवरे, मिना कांबळे, रामकवर आंधळे, पंकज जोगदंड, व कर्मचारी भागवत गायकवाड, संतोष ठाकूर, धीरज करमरकर, कोमल व सर्व सहयोगीनी , सी आर पी इत्यादि उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!