Uncategorized

प्रमाणिकपणा अजूनही जिवंत आहे !

केजडी नदीच्या पुलावर सापडलेली पर्स व मोबाईल केला पोलीसांच्या स्वाधीन : मोबाईल वरून लागला पर्सच्या मालकाचा शोध

वादळ वार्ता – गौतम बचुटे

दोन शेतकऱ्यांना केज येथे रस्त्यात सापडलेली लेडीज पर्स त्यांनी पोलीस ठाण्यात जमा करून मूळ मालकाला त्याला परत केली.

या बाबतची माहिती अशी की, दि. २८ मार्च रोजी तुकाराम कोंडीराम थोरात आणि गणेश उत्तम थोरात दोघे रा. कुंबेफळ हे दोघे गावाकडे जात असताना त्यांना केज येथून वाहणाऱ्या केजडी नदीच्या पुलावर लेडीज पर्स आढळून आली. तयानी ती पर्स उचलून तात्काळ केज पोलीस ठाण्यात जमा केली. काही वेळाने त्या पर्स मध्ये असलेल्या मोबाईलची रिंग वाजताच पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी त्याची चौकशी केली असता ही पर्स आणि मोबाईल हे केज पंचायत समितीच्या प्रभाग समन्वयक सोनिया माधवराव घोरे यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्या पर्समध्ये मोबाईल, आधार कार्ड, ए टी एम व इतर कागदपत्रे होती. त्या नंतर पोलीस उपनिरीक्षक वैभव यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. नंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार आणि पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी तुकाराम कोंडीराम थोरात आणि गणेश उत्तम थोरात यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून सदर पर्स, मोबाईल आणि त्यातील सर्व साहित्य हे ओळख पटवून सोनिया घोरे यांना परत केले.

या प्राणिकपणा बद्दल तुकाराम थोरात आणि गणेश थोरात यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!