केज विशेष / रामदास तपसे
लोकसभा निवडणूक संपते ना संपते तोच आता विधानसभा निवडणुकीच्या गप्पा गावागावात आणि चौकाचौकात होताना पाहायला मिळत आहेत. केज विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी देखील अनेक इच्छुक सध्या तयारी करत असताना दिसत आहेत. त्यामध्ये विद्यमान आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्यासह मागील वेळी निवडणूक लढलेल्या डॉ अंजली घाडगे, डॉ नयना सीरसट यांच्याही नावाची जोरदार चर्चा होत आहे, परंतु असे असले तरी दोन खासदारांच्या तालमीत वाढलेले युवक नेतृत्व कपिल मस्के यांचीही उमेदवारी अचानकपणे येऊ शकते असीही दबक्या आवाजात चर्चा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून केज शहर आणि तालुक्यातील एक प्रसिद्ध युवक नेतृत्व म्हणजे कपिल मस्के. केज शहराच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचें उल्लेखनीय असे कार्य आहे. केज ग्रामपंचायतला सदस्य म्हणून त्यांना शहरवासीयांनी संधी दिली होती. त्यानंतर नगरपंचायत मध्ये देखील नगरसेवक म्हणून पुन्हा मतदारांनी संधी दिली होती. केजमधे अनेकदा ते निवडून आलेले असल्याने त्यांचा सर्वदूर पर्यंत मित्रपरिवार आणि हितचिंतक परिवार आहे. मागील काळामध्ये खासदार रजनीताई पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे कार्य केलेले आहे. माजी मंत्री अशोक पाटील तसेच पशुपतीनाथ दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय वाटचाल यशस्वी केलेली आहे. याबरोबरच मागील काळात केज विधानसभा निवडणुकीत डॉ अंजली घाडगे यांच्या प्रचारार्थ त्यांनी प्रमुख भूमिका घेऊन उमेदवारी पासून मतदानापर्यंत लक्षवेधी कार्य केले होते.
त्यानंतर मग काही काळापासून ते आता नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. खासदार रजनीताई पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ते आजही लाडके आहेत यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत केज विधानसभा निवडणुकीत हेच कपिल मस्के देखील उमेदवार असू शकतात असीही चर्चा होत आहे. खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विजयासाठी कपिल मस्के यांनीही जीवाचे रान केलेले आहे. शिवाय दोन्ही खासदार त्यांच्या नावाला पसंती देऊ शकतात यामुळे केजच्या आमदारकीसाठी त्यांचीही उमेदवारी येऊ शकते असी चर्चा काही ठिकाणी सुरू आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!