केज/सचिन भालेराव
खासदार पदाची शपथ घेऊन दिल्लीहून पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असलेल्या शेतकरीपुत्र बजरंग बप्पा सोनवणे यांच्या भव्य अशा सत्कार सोहळ्याचे आयोजन केज येथे सोमवार दि 8 रोजी करण्यात आले आहे .भूमिपुत्राच्या या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सत्कार सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष शिवाजी चौधरी व भाई मोहन गुंड यांच्या वतीने करण्यात आले आहे .माजीमंत्री अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विठाई मंगल कार्यालयात पार पडणाऱ्या या सोहळ्यास आ संदीप क्षीरसागर , राकॉ चे युवाप्रदेशाध्यक्ष महेबूब शेख , सहाय्य्क संचालक डॉ अशोक थोरात , माजी आ पृथ्वीराज साठे , कालिदास आपेट , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख , शिवसेना उबाठा चे जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे , माजी सभापती बालासाहेब जाधव , सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले , डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे , माजी सभापती राजेसाहेब ( पापा ) देशमुख , कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर , शिवसेना उबाठा तालुकाध्यक्ष अप्पासाहेब जाधव , माजी नगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट , राकॉ श प च्या कार्याध्यक्ष संजीवनी देशमुख , काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे , जेष्ठ नेते सय्यद साजेद अली , राकॉ प श प चे केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव , सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अंगद इंगळे , राकॉ प श प चे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख , शिवसंग्रामचे केज तालुकाध्यक्ष नामदेव गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत .
तसेच यावेळी ख वि संघाचे चेअरमन बालासाहेब बोराडे , व्हाईस चेअरमन दत्तात्रय ठोंबरे , मा जी प सदस्य सुरेश पाटील , उमाकांत भुसारी , प्रेमचंद कोकाटे , महेश गायके , महादेव लाड , युवराज दादा काळे , कबीर इनामदार , शमशोद्दीन इनामदार , प्रकाश कामाजी , महादेव सूर्यवंशी , युवराज दादा गोरे , उत्तम अप्पा मस्के , दिलीप गुळभिले , गोविंद कणसे , तस्लीम इनामदार , हाजी अमजद खतीब , लालासाहेब वायबसे , शीतलताई लांडगे , नसरीन बागवान , कुलदीप करपे , विकास मिरगणे , अशोक सोनवणे , अभय कुलकर्णी , नंदकुमार मोरे , रंजित घाडगे , दैनिक वादळ वार्ता चे संपादक अजय भांगे , बाबासाहेब मस्के , चंद्रकांत पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
तरी आपल्या भूमिपुत्राच्या होणाऱ्या या भव्यदिव्य अशा सत्कार सोहळ्याचे साक्षी होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!