वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज तालुक्यातील भाटुंबा येथील बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या युवतीचा रात्री ८:३० वाजणेच्या सुमारास घराच्या जवळच विषारी सर्पदंश होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत असलेल्या व अभ्यासामध्येही हुशार असलेल्या या मुलीच्या मृत्यूने गावात आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील भाटुंबा येथील अनंत कापरे यांची हे व्यवसायाने शेतकरी असुन त्यांना एक मुलगा आणि तिन मुली अशी अपत्ये होती. पैकी सर्वात मोठी असणारी मुलगी अश्विनी अनंत कापरे वय 1८ वर्ष हि इयत्ता १२ वी वर्गात शिक्षण घेत होती. ति बुध्दीने अत्यंत हुशार असल्याने ती केज येथे काळे गोरे ईन्स्ट्युट येथे टाईपरायटींगचा कोर्स करत होती. दि. २७ ऑगस्ट शनिवारी रात्री ८ ते ८:३० वाजणेच्या दरम्यान अश्विनी हि लंघुशंकेसाठी घरासमोरील अंगणात गेली असता तिला न्ह्यायला आलेला काळ टपून बसला होता. तिला विषारी सापाने डंख केला मात्र तिने हा दंश ऐवढे गांभीर्याने न घेता घरात कोणालाही न सांगता पाणी पिऊन झोपली. परंतु तिला जोराच्या वेदना होवु लागल्या व घाम येवु लागल्याने हि घटना तिने आईवडिलांना सांगतल्यामुळे आई वडीलांनीही कोणालाही न सांगताच तिला मोटार सायकलवर बसवुन केज येथील उपजिल्हा रुग्नालयात आणले असता त्या ठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ या रुग्णालयात पाठवले. रुग्नवाहिकेतुन तिला नेत होते.
परंतु वेळ अश्विनीचा काळ बनुन आल्याने वाटेतच तिचा रात्री ११:०० वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. अशी माहिती या गावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर अरुण धपाटे व नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र केजचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव जोगदंड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
अंबेजोगाई येथील दवाखान्यात शवविच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. अश्विनी हिच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात भाटुंबा येथे दि.२८ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी ११:००वा. अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अनंत कापरे यांचे जवळचे मित्र अरुण धपाटे हे केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर असून त्यांनी याबाबत सर्वतोपरी मदत केली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी गरीबाच्या घरातील एक पणती विझलीच.
……………………………………………………………………
कु. अश्वीनी अनंत कापरे हिचा संर्पदंशाने झालेला दुर्दैवी मृत्यू हा केवळ उपचारा अभावी झाला असुन केजच्या शासकिय रुग्णालयात तिला पुर्ण उपचार मिळाले असते तर कदाचित अश्विनीचे प्राण वाचले असते. या ठिकाणचे डॉक्टर हे जबाबदारीने काम करत नसुन अशा रुग्नांना ते नेहमी पुढे पाठवतात. त्यामुळे रुग्णांना उपचार न मिळाल्याने त्यांना आपला जिव गमवावा लागतो.
अरुण धपाटे. भाटुंबा.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!