वादळवार्ता वार्तांकन – केज
राज्यात व देशात हिंदू धर्माविषयी द्वेषभावनेने हिंदू मुलींना प्रेमाचे नाटक करून फसवणूक करून पळवून नेणे व नंतर धर्मातंरण करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करणे नंतर त्यांच्या हत्या करणे किंवा त्यांना आयुष्यातून उध्वस्त करण्यारा विरोधात कठोर शासन करण्यासाठी तसेच लव्ह जिहाद व धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासाठी केज येथे बुधवार दि २८ डिसेंबर रोजी समस्त हिंदू समाजाचा भव्य मुकमोर्चा काढण्यात येणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हिंदू समाज बांधवाकडून करण्यात आले आहे .
राज्यात व देशात लव्ह जिहादच्या सातत्याने घटना घडत असून विविध माध्यमातून बातमी स्वरूपात सातत्याने समोर येत असतात याला कुठे तरी आळा घातला पाहिजे यासाठी कोणत्याही प्रकारे कोणीही दुसऱ्या धर्माच्या मुली व महिलाना प्रेमाच्या जाळ्यात ओढू नये यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी . प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्माच्या मधे कसलिही ढवळाढवळ करु नये तसेच लव्ह जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणीना फसवून नादाला लावून पुन्हा हत्या केल्या त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी समस्त हिंदू समाज बंधु भगिनीचा भव्य स्वरूपात मुकमोर्चा बुधवार दि २८ डिसेंबर रोजी भवानी मंदिर धारूर रोडपासून निघून तहसील कार्यालया पर्यंत निघणार आहे , या मोर्चास समस्त हिंदू बंधु भगिनीनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे.