Uncategorized

मन हेलावून टाकणारे आसमानी संकट ; केज तालुक्यातील बळीराजा संकटात  

वादळवार्ताकेज

शेतकरी पाठीचा मनका सरळ ठेवुन स्वाभिमानाने संघर्ष करणारा नायक त्याचा संघर्षमय प्रवास अविरतपणे काल आज आणि उद्या

दि ८ एप्रिल शनिवार रोजी दुपारी ३ वाजता आचानक ढंगाच्या गडगडाटासह वादळी गारांचा पाऊस , त्या पाऊसामुळे आधीच अतिवृष्टीच्या तडाक्यातून कसा बसा सावरुण शासकीय अनुदानाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार आसमानी संकट आले आणी कांही क्षणात होत्याचे नव्हते झाले.

आचानक आलेल्या वादळी वा-यासह गारांच्या पाऊसामुळे केज तालुक्यातील असंख्य गावांना फटका बसुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये नांदूरघाट, उत्तरेश्वर पिंप्री, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव डोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, चिंचोली माळी, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, विडा या ठिकाणी वादळवारा आणि विजेच्या गडगडटासह गारपीट झाली. या गारपिटीने आंबा, भाजीपाला, फळभाज्या, टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे तथा अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबरोबरच देवगाव, हंगेवाडी आणि मांगवडगाव येथे तीन ठिकाणी वीज पडून पाच जनावरे दगावली गेली.

याची लोकप्रतिनीधिनीं तत्काळ दखल घेऊन पंचनामे करण्याचे व आर्थिक मदत करावी या आशयाचे तडकाफडकी पत्र काढले एककडे जोराचा पाऊस तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींचे पत्र परंतु पाठीमागे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीचे आद्याप पर्यंत आर्थिक मदत (अनुदान ) मिळाले नसताना फक्त पत्रावरच समाधान मानण्याची वेळ केज तालुक्यातील शेतकऱ्यांनंवर आली आहे.

यामुळे सद्याच्या गारपीटीमुळे तथा मागील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळेल का ? स्थळ पंचनामे होतील का ? मदत किती दिवसांनी, महिन्यांनी का वर्षांनी मिळेल ? आदि प्रश्न केज तालुक्यातील शेतकऱ्यांना पडले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!