वादळवार्ता – गौतम बचुटे
दि. ३ जून रोजी रात्री ९:१५ वा. च्या सुमारास केज येथील पोलीस ठाण्या समोर पंचायत समितीतीच्या जवळ असलेल्या जनसेवा महा-ई-सेवा केंद्राला एक भरधाव वेगातील एका स्कॉर्पिओ गाडी क्र. (एम एच-०६/ ए झेड- २९११) रस्त्याच्या दुभाजकावर चढून धडक दिली. दरम्यान या गाडीने केज येथील बस स्टँडवर एका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कुटीला धडक देऊन पळून जात होता.
गाडीचा चालक याने मद्यपान करून गाडी चालवीत होता तर त्याच्या सोबत एक महिलाही होती. अपघाताचा आवाज ऐकू येताच पोलीस कर्मचारी शिवाजी कागदे, मेहेत्रे आणि नितीन जाधव हे अपघातस्थळी बचावासाठी धावत आले. त्यांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. सुदैवाने महा ई सेवा केंद्र बंद असल्याने अनर्थ टळला तर गाडीतील महिला आणि चालक हे सुद्धा सुखरूप आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!