वादळवार्ता/ परळी वै.
परळी -राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच त्यात आता मुस्लीम समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. मुस्लिम आरक्षण आणि कंत्राटी भरती रद्द करावं या मागणीसाठी परळीत १३ ऑक्टोबर पासून एमआयएमचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मुस्लीम आरक्षण आणि कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीचा आदेश रद्द करा या दोन प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आले आहे.
काल संध्याकाळी परळी उपजिल्हा रुग्णालयची एक पथकांनी उपोषण स्थळ भेट देऊन उपोषणकर्त्यांची तब्येतची विचारपूस करून चेकअप केली होती .आज उपोषणचा तिसऱ्या दिवशी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांची तब्येतची विचारपूस करून त्यांची जी मागणी आहे ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असा आश्वासन दिले आहे.
परळी तालुका एम.आय.एम पक्षाचे तालुकाध्यक्ष शेख शरीफ आमरण उपोषण करित आहेत मुस्लिम समाजातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवून समाजाची दुर्दशा झालेली असून सुध्दा महाराष्ट्र सरकार आरक्षण देत नाही हीच शोकांतिकाच, कोर्टाने ५ टक्के शैक्षणिक आरक्षण देऊन अनेक वर्षे झाली असूनदेखील राज्य सरकार मुस्लिम समाजाचा अंत पाहत आहे, यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी व समाजसेवकांनी तसेच राजकीय नेत्यांनी आमरण उपोषणास भेट देऊन पाठींबा दिला.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!