आपला बीड जिल्हाआपले केजराजकारण

पत्रकार रमेश गुळभिले बीड लोकसभा लढवणार 

वादळवार्ता/केज 

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार व माहिती कार्यकारी अधिकारी संघटनेचे  गुळभिले हे निवडणूक लढवणार असून सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असून सर्व समाजाचा पाठिंबा मिळणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले बीड लोकसभा मतदार संघात लोकसभेची रणधुमाळी वाढत असताना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षात निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार आपली प्रतिष्ठापनाला लावत असताना सर्वसामान्य नागरिकांसाठी रणांगणात उतरणार असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकसभेत मी प्रयत्न करीन तसेच सध्या चालू असलेले माणसा माणसातलं वातावरण या राजकीय पक्षांनी अतिशय गढूळ करून टाकलेले असून सर्व समाजांना सोबत घेऊन ही निवडणूक मी लढत असून माझ्यासोबत सर्व संघटना सर्व जातीय संघटना धार्मिक संघटना याचबरोबर सामाजिक संघटना माझ्यासोबत आहेत हे त्यांनी आवर्जून सांगितले असून राजकारणात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व इतर पक्ष हे आपले मतासाठी सर्वसामान्य जनतेत तेढ निर्माण करून विनाकारण असंतोष निर्माण करत आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला ठेवून फक्त राजकारण करण्यात हे पक्ष गुंतलेले असल्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व मित्र परिवारासोबत चर्चा केली असून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले माझ्यासोबत तन-मन-धनाने बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सर्वसामान्य नागरिक सोबत असल्याचे रमेश सांगितले सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत गरजा स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही तशाच आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न व्यावसायिक प्रश्न बेरोजगारी या सर्व विषयावर मी काम करणार असून बीड जिल्ह्याची ओळख हे लघु उद्योगासाठी तयार करणार व बीड जिल्हा हा जागतिक पातळीवर व्यावसायिक हब म्हणून निर्माण करणार असल्याचे बोलताना त्यांनी सांगितले .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!