आपला बीड जिल्हाआपले केज

केज नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांन कडुन माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवत होतेय अर्जदाराची चेष्टा

वादळवार्ता – केज

सजग नागरिकांसाठी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा शासन व प्रशासनातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे व त्यांच्यात पारदर्शकता आणून ( सामान्य नागरिकांना मुदतीत व योग्य न्याय मिळवून देण्यासाठी एका ब्रम्हास्त्रासारखे शस्त्र असले तरी केज नगरपंचायत मधील उच्च शिक्षित परंतु कायदेसंबंधी अप्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी या कायद्याची सर्रास चेष्टा करताना दिसून येत आहेत .

याबाबत माहिती अशी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत केज नगरपंचायत विभागनिहाय जनमाहिती आधिकारी यांच्याकडे दि २३/०३/२०२३ रोजी विषय १ ) केज नगरपंचायत च्या माध्यमातून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत नगरपंचायतने सर्व माध्यमातून वसुल केलेल्या कर ( TAX ) स्वरूपाने जमा केलेली रक्कमेची माहिती, तथा जनरल खात्यामध्ये जमा केलेल्या रक्कमेच्या खर्चाचे योजनानिहाय विवरण, विड्रो केलेले चेकची माहिती संबंधित सर्व दस्तावेजच्या प्रतिसह हि माहिती अधिकाराच्या लोगोसह छायांकित, सांक्षाकित करुण द्यावे. विषय २)केज नगरपंचायतच्या माध्यमातुन मंदीप इंटरप्रायजेस – खोपोली – पालघरचे कचरा व्यवस्थापन टेंडर संपल्यानंतर ते मार्च २०२३ पर्यंत केज नगरपंचायतच्या वतीने केज शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी एकुण वापरत असलेल्या घंटागाड्याची माहिती, त्यांची कागदपत्रे त्यांनी नगरपंचायत सोबत केलेला करार त्या सर्व घंटागाड्या करीता वापरले गेलेले महिन्याप्रमाने इंधन (डिजेल), एकुण सर्व गांड्यानवर इंधनाकरीता (डिजेल ) झालेला खर्च, घंटागाड्या व इतर कचरा व्यवस्थापनाच्या दुरुस्ती करीता केलेला खर्च, कचरा व्यवस्थापन करण्यासाठी इतर वापरले जात असलेली वाहने सर्व वाहनचालकाचे मानधन त्यांची संख्या सर्व कचरा गोळा करण्याऱ्याची संख्या , त्याची नावे व मानधन यांची माहिती संबंधित सर्व दस्तावेजच्या प्रति हि माहिती अधिकाराच्या लोगोसह छायांकित, सांक्षाकित करुण द्यावे. विषय ३ )आपल्या केज नगर पंचायत अंतर्गत घरकुल योजनेच्या सुरुवाती पासून ते २०२३ पर्यन्त घरकुल लाभार्थ्यांची नावे, पत्ता, घरकुल बांधकामाचे लोकेशन ,देण्यात आलेले अनुदान, घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्याचे निरीक्षण अहवाल इत्यादि संबंधी वर्षनिहाय माहिती द्यावी.

सदरील माहिती ३० दिवसात देणे कायद्यान्वये बंधनकारक असताना मात्र केज न.प. मधील कर्मचार्‍यांनच्या उदासिनतेमुळे अर्जदाराने मागीतलेली माहिती मिळंत नाही. तर माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवत अर्जदारास केज न.प.च्या येरजार्‍या मारायला लावुन त्याची चेष्टा केली जात आहे.

या तीन्ही अर्जावर माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष पत्रकार अजय भांगे यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम १९ / १ नुसार केज नगरपंचायतच्या मुख्याधिकारी तथा प्रथम अपीलीय अधिकारी महेश गायकवाड यांच्याकडे प्रथम अपील केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!