केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दर्पण दिनाच्या निमित्ताने पत्रकारांचा पोलीस ठाण्यात सत्कार केला.
वादळवार्ता वार्तांकन – केज
या बाबतची माहिती अशी की दर्पण दिनाच्या औचित्य साधून केज पोलिसांनी पत्रकारांना पोलीस ठाण्यात सत्कार केला. तसेच पत्रकारांना पेन व डायरी सप्रेम भेट दिली. यावेळी आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, सचिव गौतम बचूटे, सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय भांगे सचिव मुबशिर खतीब , झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय हंडीबाग व सचिव दशरथ चवरे, संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गलडे ,श्रीराम तांदळे, स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जेष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी, मधुकर सिरसट, डी डी बनसोडे, दिनकर राऊत, संतोष गालफाडे, महादेव गायकवाड, मझर शेख, सतिश केजकर, रमेश इतापे, धंनजय घोळवे, तात्या गवळी, महादेव दळवी, सन्नी शेख, ठोंबरे यांच्यासह बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते.
या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच पत्रकार डी डी बनसोडे यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले तर पत्रकार गौतम बचुटे यांनी आभार व्यक्त केले.