वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील साळेगाव येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा बैल दगावला आहे.
साळेगाव तालुका केज येथे गुरुवार दि.२७ ऑक्टोबर रोजी पहाटे जय जोगदंड यांच्या बैलाला विषारी सर्पदंश झाला. यात त्यांचा बैल जागीच दगावला आणि तो साप देखील जागीच गतप्राण झाल्याचे आढळून आले.
बैलावर केले अंत्यसंस्कार
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या बैलाचे जोगदंड परिवाराने दुःखी अंतः करणाने त्यांच्या शेतात दफनविधी करून श्रद्धांजली अर्पण केली.