आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

तिर्रट नावाचा जुगार खेळणारे नऊ जुगारी पोलीसांच्या ताब्यात

वादळवार्ता – गौतम बचुटे

केज तालुक्यातील कोरेगाव येथे तिर्रट नावाचा जुगार खेळणारे नऊ जुगारी केज पोलिसांनी ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला.

या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटीलयांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली, की कोरेगाव ता. केज येथे एक इसम हा त्याचे स्वतःचे फायद्या करिता विनापरवाना बेकायदेशीरपणे तिर्रट नावाचा जुगार खेळवून जुगार अड्डा चालवीत आहे.

माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना माहिती देऊन पोलिस अधीक्षक नंदकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस नाईक श्रीकांत चौधरी, आनंद इनकर, महादेव बहिरवाळ, अनिल मंदे यांच्या पोलीस पथकाने दि. २० मार्च रोजी सायंकाळी कोरेगाव येथे छापा मारला. त्यावेळी कोरेगाव येथे एका घराचे आडोशाला नऊ इसम गोलाकार बसून तिर्रट नावाचा जुगार खेळताना जुगार अड्डा मालक यांच्यासह एकूण नऊ जुगारी जागीच मिळून आले. त्यांना ताब्यातून घेऊन त्यांच्या कडून नगदी १० हजार ३०० रु. व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

पोलीस अंमलदार महादेव बहीरवाळ यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!