केज । प्रतिनिधी
पुनम मुरलीधर रोकडे यांनी पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परिक्षेमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँन्ड एप्लिकेशन या विषयामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
केज तालुक्यातील मौजे साबला येथील रहिवाशी मुरलीधर रोकडे यांच्या कन्या तसेच सुशील रोकडे यांच्या बहिण पुनम मुरलीधर रोकडे यांनी पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परिक्षेमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँन्ड एप्लिकेशन या विषयामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण जवाहर विद्यालय केसापुरी कॅम्प येथे झाले असुन उच्च शिक्षण हे डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर येथे झाले व कॉम्प्युटर सायन्स अँन्ड एप्लिकेशन या विषयात त्या सेट परिक्षा उतीर्ण झाल्या आहेत. त्यांचे पूर्वीचे शिक्षण MSC,M.phil,PHD झाले असुन सेट परीक्षा उतीर्ण झालेमुळे त्यांच्या शिक्षणात भर पडली आहे यासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून शुभेच्छा दिल्या जात आहेत .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!