आपला बीड जिल्हाक्राईम

केज तालुक्यातील खळबळजनक घटना

ऊस तोडणी वरून महिलेस विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

तिघा विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यात ऊस तोडणीच्या कारणावरून एका ऊस तोड करणाऱ्या महिलेस तू आमच्या सोबत ऊस तोडणीच्या कामाला का येत नाहीस म्हणून तिला बळजबरीने विषारी द्रव्य पाजून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली असल्याने ऊस तोडणीसाठी मजुरांचा छळ आणि अत्याचाराच्या घटना घडत आहेत.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील जोला येथे दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० वा. राहीबाई अशोक ढाकणे ही ३६ वर्षीय महिला एकटी घरात असताना अशोक ढाकणे व दैवशाला ढाकणे हे तिच्या घरी गेले आणि आमच्या सोबत ऊस तोडणीसाठी चल असे म्हणाले. तेव्हा राहीबाई त्यांना म्हणाली की मागच्या वर्षीचे तुमच्याकडे असलेले ४४ हजार रु द्या. असे म्हणताच अशोक ढाकणे व दैवशाला ढाकणे यांनी राहीबाई ढाकणेच्या केसाला पकडुन खाली पाडले. तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने अच्युत अण्णासाहेब ढाकणे याने विषारी औषधाची बाटलीचे बुच उघडून काढुन बाटली तोंडात टाकुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

सदर महिलेवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबा वरून केज पोलिस ठाण्यात अशोक ढाकणे, दैवशाला ढाकणे अच्युत अण्णासाहेब ढाकणे या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. ४९५/२०२२ भा. दं. वि. ३०७, ४५२, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!