आपला बीड जिल्हाआपले केजराजकीय

शेतकरी कामगार पक्षाची केज येथे विभागीय बैठक संपन्न 

मराठवाड्यात पुन्हा शेकापक्ष उभा करु -भाई गोळेगावकर 

प्रा राजेश ढवळे, मोहन गुंड, तुषार गोळेगावकर, पक्ष बांधणीसाठी सक्रीय होणार

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

भाई केशवराव धोंडगे. भाई किसनराव देशमुखान श्रद्धांजली अर्पण.

केज येथे दि 8 रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख लोकांची बैठक संपन्न झाली या बैठकीला अध्यक्ष म्हणून भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार भाई ज्ञानोबा हरी गायकवाड, मढाचे भाई बाळासाहेब पाटील,भाई प्रा राजेश ढवळे, भाई तुषार गोळेगावकर, ॲड गोविंद डुमणे, प्रा शिवाजीराव पौळ, ॲड गोले पाटील, गोविंदराव चौरघडे, मुख्तार पठाण, राजाराम रसाळ, भाई गिनाभाऊ काळे ,भाई बाबुराव जाधव , भाई बाळासाहेब धस,भाई आसद बल्खी,भाई श्रेयश कोतुळ भाई अमृतराव देशमुख भाई भास्कर कुरूद, भाई अशोक रोडे, मुंजाबा पंचाळ, माऊली जाधव गणपत कोळपे सुमंत उंबरे, अनिल कदम , महेश गायकवाड , मंगेश देशमुख, विष्णू शेळके, मुकुंद शिंदे महेश गायकवाड मंगेश देशमुख यांच्यासह प्रमुख लोक उपस्थित होते, यावेळी भाई केशवराव धोंडगे, आणि भाई किसनराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, बैठकीत शेतकरी कामगार पक्ष काल आज आणि उद्या या विषयावर सर्वच उपस्थितानी मनोगत व्यक्त केले, मराठवाड्यात एक काळ शेकापचा होता लोकांच्या प्रश्नांवर आपन प्रमाणीक काम केलं आहे, आजुन करत राहु पुन्हा मराठवाड्यात पलक्ष उभा करु मी स्वतः मराठवाड्यात फिरणार आहे असे गोळेगावकर यांनी व्याख्या केले,

भाई बाळासाहेब पाटील यांनी पक्षाची शिस्त कशी आसते शिस्तीत काम उभ केल की पक्षाचं संघटन उभ राहते, कार्यकर्ता हिरीरीने काम करतो आणि आपन वेळ देऊन काम करु असे म्हणाले.

तर प्रा ढवळे यांनी पक्ष आज नाही बाधला तर उद्याचा काळ पक्षासाठी चांगला नाही चांगल्या कार्यकर्त्यांना मानसिक बळ दिलं पाहिजे,पक्षाची रुल्स पाळुन निवडी झाल्या पाहिजेत त्या शिवाय पक्षाचं संघटन वाढुच शक्त नाही आसे नमुद केले, यावेळी अनेकांनी आपले मत मांडले .पक्ष बांधणी संदर्भात मराठवाड्यात पुन्हा शेतकरी कामगार पक्ष बांधण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठीची प्रमुख मुख्य चर्चा करण्यात आली,तर शेतकर्याच्या प्रश्नावर चळवळ उभी करुन संघटनात्मक काम उभा करण्याचा निश्चय या बैठकीत करण्यात आला. यावेळी बैठकीचे आयोजक भाई मोहन गुंड यांनी सर्वांचे आभार, मानले, आपन मराठवडभर शेतकर्यांच्या प्रश्नावर काम करणार असल्याचे भाई मोहन गुंड,भाई तुषार गोळेगावर, भाई बाबुराव जाधव सांगीतले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!