वादळवार्ता – केज
येथून केज तालुक्यातील दिपेवडगावकडे प्रवासी घेऊन जात असलेल्या अप्पे रिक्षाला फॉर्च्युनरची जोरदार धडक बसून घडलेल्या भीषण अपघातात एक ठार तर आठजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ( दि. १० ) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई-केज रस्त्यावर लोखंडी सावरगाव येथील पेट्रोल पंप जवळ घडली आहे. जखमींना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई येथून दिपेवडगाव ( ता. केज ) येथे अप्पे रिक्षा प्रवासी घेऊन जात होता. दरम्यान तो लोखंडी सावरगाव येथील पेट्रोल पंप जवळील पुलाच्या बाजूला थांबला होता. यावेळी लातूर कडून फॉर्च्युनर भरधाव वेगात आली. ती सरळ अप्पे रिक्षावर धडकून भीषण अपघात घडला. या अपघातात रिक्षातील एक जन जागीच ठार झाले. तर रिक्षातील इतर प्रवाशी गंभीर जखमी झाले. जखमी मध्ये चार महिला व चार पुरुषांचा समावेश असल्याचे समजते. घटना घडताच उपस्थितांनी धाव घेत अपघात ग्रस्तांना मदत केली. १०८ नंबर डायल करुन रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीवर येथे उपचार सुरू आहेत. धडक बसताच फॉर्च्युनर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पसार होत सरळ युसुफ वडगाव पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी चालक व वाहन ताब्यात घेतले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!