वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
घरा समोर झोपलेल्या एका २३ वर्षीय विवाहित तरुणीचा विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.
केज तालुक्यातील २३ वर्षीय विवाहीत तरुणी दि. २ फेब्रुवारी रोजी तिच्या घरा समोर झोपलेली असताना मद्यरात्री २:०० वा. च्या सुमारास आरोपीने तिच्या हाताला धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला.
पीडितेच्या फिर्यादीवरून दि. ५ फेब्रुवारी रोजी आरोपी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६३/२०२३ भा. द. वी. ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अशोक मेसे हे पुढील तपास करीत आहेत.
पीडित महिला आणि तिच्या पती विरुध्द ही गुन्हा दाखल
दरम्यान विनयभंग प्रकरणातील आरोपीने पीडित विवाहिता आणि तिच्या पती विरुद्ध केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. १ फेब्रुवारी रोजी विवाहितेचा पती याने त्याला दारू पाजून कुऱ्हाडीने व चाकुने मारहाण करून रक्तबंबाळ केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याच्या तक्रारी वरून पीडित महिला व तिचा पती या दोघा विरुद्ध गु. र. नं. ६२/२०२३ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस नाईक उगलमुगले हे करीत आहेत.