वादळवार्ता वार्तांकन – बीड
२०१९ पासून शाळेवर गैरहजर असलेल्या भांडारावाडी ता . बीड ) जिल्हा परिषद शाळेतील अनिल संतराम इंगोले या शिक्षकाला जिल्हा परिषदेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले .
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी ही कारवाई केली . नेकनूर केंद्रातील भांडारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर इंगोले हे ९ फेब्रुवारी २०१ ९ पासून अनधिकृत गैरहजर आहेत . त्यामुळे त्यांना सुरुवातीला जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करून कारणे दाखवा नोटीस बजावली होती .
त्यानंतर त्यांना निलंबन काळात सारणी ( ता . केज ) येथील हनुमाननगर शाळेत पदस्थापना दिली होती तिथेही ते रुजू झाले नाहीत . त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती . ते विभागीय आयुक्तांकडेही चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याने त्यांची एकतर्फी सुनावणी झाली . त्यांना अंतिम संधीही दिली होती .
मात्र , ते रुजू झाले नाहीत . त्यांच्या चऱ्हाटा या मूळगावी जाऊन मुख्याध्यापकाने त्यांचा शोध घेतला ते मिळून आले नाहीत . ते इथे राहत नसल्याबाबत पुतण्यासह ८ जणांचे जबाब नोंदवले होते . त्यांना सेवेची आवश्यकता नाही असे समजून त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव तयार केला होता . मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या प्रस्तावावरून अनिल इंगोले यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून बडतर्फ केले .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!