वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज-बीड रोडवर मस्साजोग जवळ एसटी बस आणि पिकपचा गंभीर अपघात झाला असून उपचारासाठी घेऊन जात असताना एकाचा मृत्यू झाला; तर एक मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लातूर येथे हलविले आहे.

सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वा. च्या दरम्यान केज-बीड रोडवर मस्साजोग जवळील हनुमंत पिंप्रीकडे जाणाऱ्या फाट्या जवळ सोयाबीन काढणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे पिकअप क्र. (एम एच/३२/बी ९७३६) आणि धारूर आगाराची एसटी बस धारूर-मुंबई क्र. (एम एच-१४/बी टी-२५१५) यांचा अपघात झाला. या अपघातात सोयाबीन कापणीचे काम करणारे अजिनाथ मच्छिंद्र घोळवे वय (३० वर्ष) रा. मुंडेवाडी आणि बाबासाहेब शंकर ठोंबरे वय (३६ वर्ष) रा. दहिफळ वडमाऊली हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केल्या नंतर उपचारा दरम्यान अजिनाथ मच्छिंद्र घोळवे वय (३० वर्ष) रा. मुंडेवाडी याचे दुर्दैवी मृत्यू झाला. तर बाबासाहेब शंकर ठोंबरे वय (३६ वर्ष) रा. दहिफळ वडमाऊली याच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच १०८ क्र. रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविले आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, जमादार उमेश आघाव, पोलीस जमादार देवकते, पोलीस नाईक बाळराजे सोनवणे, पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना मदत केली.