व्याख्यानाचा लाभ घ्यावा – आनंदगावचे ग्रामस्थ
वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज तालुक्यातील आनंदगाव येथे आदर्श सरपंच, पाटोदा गावचे शिल्पकार भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे .
सविस्तर वृत्त असे कि संपुर्ण महाराष्ट्रामध्ये सरपंच म्हणुन प्रसिद्ध असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम दि ११ ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे.
तरी ग्राम सुधारण्याचा मूलमंत्र घेण्यासाठी नागरिकांनी या व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन आनंदगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .
आनंदगाव नेहमीच चळवळीच्या रूपाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून अग्रेसर राहिलेले आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे निमित्त ठेवून युवकांमध्ये जनजागृती व्हावी आदर्शगाव निर्मितीसाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून पेरे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
तरी परिसरातील सरपंच उपसरपंच नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!