वादळ वार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियाच्या आयसीएआय वतीने घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटच्या (सीए ) अंतिम परीक्षेत केज येथील ज्ञानेश प्रवीण देशपांडे यांनी यश प्राप्त केले आहे.
वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रवीण देशपांडे यांचा मुलगा ज्ञानेश प्रवीण देशपांडे यांचे ईयत्ता १ ते ४ पर्यंतचे मॉडर्न इंग्लिश स्कूल केज येथे शिक्षण झाले त्यानंतर नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल मध्ये ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण झाले. ११ वी व १२ वी कॉमर्स सांगली येथील चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स येथे ९० टक्के घेऊन उतीर्ण झाला. पुढे सीए करण्याचा मानस असल्यामुळे पुणे येथे क्लास केले आणी सोबत गरवारे कॉलेजला बीकाॕम केले.
१० वीला असताना स्वर्गीय गोपिनाथ मुंडे साहेबांची भेट झाली होती.स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सीए हो असे सांगितले होते. त्यांच्या शब्द अंतिम धरून तो आज सीए झाला आहे.
वयाच्या २३ व्या वर्षी सीए होण्यात त्याचे आजोबा भाऊसाहेब देशपांडे, आजी प्रमिला देशपांडे यांचा आशीर्वाद वडील प्रविण देशपांडे,आई शर्मिला देशपांडे,काका प्रशांत देशपांडे यांचा लाभला. त्याचा भाऊ प्रथमेश देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले.
केजकर परीवारातील पहिला चार्टर्ड अकाउटंन्ट झालेल्या ज्ञानेश प्रविण देशपांडे याचा स्वामी समर्थ मंदिरात देशपांडे परीवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!