वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
जावयाने सासऱ्याला आधी मारहाण केली; मग हातात ठोंब्या घेऊन धावला; अन् मग का अडविले म्हणून सासऱ्याला कडाडून चावला !
नवरा बायकोच्या भांडणात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या सासऱ्याच्या अंगावर ठोंब्या घेऊन धावलेल्या जावयाने चक्क सासऱ्यांच्या हाताला कडाडून चावा घेतला आहे.
या बाबतची माहिती अशी की, जवळबन ता केज येथील रहिवाशी असलेले आणि सध्या समता नगर केज मध्ये भाड्याच्या घरात राहात असलेले सौ. अश्विनी व तिचा नवरा बन्सी हंकारे या पती-पत्नीत दारू पिण्याच्या कारणा वरून भांडण होत होती. बन्सी हंकारे हा त्याची बायको आणि मुलास मारहाण करीत असल्याने; सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी आश्विनीचे वडील म्हणजे बन्सी हंकारे याचे सासरे उत्तम रंगनाथ मस्के हे दि. २६ डिसेंबर रोजी केज येथे त्यांच्या घरी गेले होते. उत्तम मस्के हे जावई बन्सी हंकारे याला समजून सांगत असताना बन्सी हंकारे याने सासऱ्याचे गचुरे धरून मारहाण केली. तसेच सासऱ्याच्या मारण्यासाठी हातात दगडी ठोंब्या घेऊन त्यांच्या अंगावर धावला; मात्र सावध असलेल्या त्याच्या सासऱ्याने त्याचा प्रतिकार करून बन्सी हंकारे याला अडविले; त्याचा राग येऊन बन्सी हंकारे याने त्याचा सासरा उत्तम मस्के यांच्या हाताच्या डाव्या मनगटाला कडकडून चावा घेतला आणि दुखापत केली.
या प्रकरणी त्याची पत्नी अश्विनी हंकारे हिच्या फिर्यादी वरून दि. २६ डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६९५/२०२२ भा. दं. वि. ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत.