वादळ वार्ता
“आम्ही घेतलेली भूमिका सामान्यांना न्याय देणारी आहे. आमची भूमिका सर्वसामान्य लोकांना पटणारी आहे. मला आठवत आहे. मी दिल्लीहून पुण्याला उतरलो. नंतर पंढरपूरला निघालो. पुण्याच्या रस्त्याला दुतर्फा हजारो लोक स्वागतासाठी उभे होते. पंढरपुरात दहा लाखांपेक्षाही जास्त गर्दी होती. सुरक्षेच्या कारणामुळे तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ नका, असे मला पोलिसांनी सांगितले. मी गाडीच्या बाहेर आलो. सर्वांना अभिवादन करत होतो. वारकही हेच माझे रक्षक आहेत, असे मी तेव्हा पोलिसांनी सांगितले. मारणाऱ्यांपेक्षा वाचवणारा मोठा असतो,” असे म्हणत सध्या स्थापन झालेल्या शिंदे गट-भाजपाच्या सरकारला लोकांचा पाठिंबा आहे, असा दावा शिंदे यांनी केला.
तसेच, “मी कधीही डगमगलो नाही. मी सुरक्षेची परवानगी केली नाही. परवा केली असती तर मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. मी जी भूमिका घेतली, ती लोकांनी स्वीकारली आहे. त्यावेळी आम्हाला विचारण्यात आलं, की हे कशासाठी सुरु आहे. आमचा यामध्ये स्वार्थ नाही, हे आम्ही त्यांना सांगितलं. माझ्यासोबत सात मंत्री आले. विरोधी पक्षातून सत्तेकडे जाण्याचा ओघ असतो. मात्र इथे उलटं झालं. सत्तेतील माणसं बाहेर पडली. एक-दोन नव्हे तर पन्नास लोक बाहेर पडले,” असे शिवसेनेतील बंडखोरीबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले.
“बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असे म्हटले जात आहे. पण मी म्हणतो एकही आमदार पडणार नाही. याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला, तर मी राजकारण सोडून निघून जाईल; असे मी तेव्हाच जाहीरपणे सांगितले आहे,” असे भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच पुढे बोलताना कोण जिंकणार कोण पराभूत होणार हे ठरवणारे तुम्ही कोण आहात? हे सगळं जनता ठरवत असते. मतदार ठरवत असतात, अशी खोचक टीकादेखील शिंदे यांनी केली.
एकनात शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागला. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. सत्तेतून पायऊतार व्हावे लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय. शिवसेनेच्या याच दाव्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला तर मी राजकारण सोडून निघून जाईल, असे मी याआधीच सांगितले आहे; असे शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!