आपला बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

जायचे होते एका गावाला ; नेले दुसऱ्या गावाला ; धारुर आगाराचा सुस्त कारभार

 वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब 

बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशाची सेवा करणाऱ्या एसटीला प्रवाशांनी आपल्या मनातुन प्रतिसाद देत अविरत पाठिंबा दिलेला आहे.

परंतु अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असुन नाहक वेळ वाया घालवावा लागत आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, धारुर ते स्वारगेट पुणे या गाडीचे दिनांक ३०-१०-२०२२ रोजी सकाळी साडेसात वाजताच्या गाडीचे तिकीट पञकार चंद्रकांत पाटील यांच्या मुलांसाठी आॕनलाईन आरक्षीत केले होते .सकाळी सात वाजल्यापासुन गाडीची वाट पहात उभे असताना धारुर आगाराची एकही गाडी स्वारगेट मार्गे रवाना झाली नाही .

साडेनऊ वाजता विभागीय नियंञक यांना चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली व आगार प्रमुखाचा नंबर दिला तब्बल सहावेळा फोन लावुनही फोन उचलण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही .

शेवटी केज नांदुर चौसाळा मार्गे साडेनऊ वाजता वेगळ्याच गाडीत बसवले . वाहक शिंदे यांना विनंती करुन तिकीट बदली करुन देऊन ज्या गावाला जायचेच नाही त्या गावाचा प्रवास करावा लागला .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!