आपला बीड जिल्हाक्राईम

शेतकरी शेतात गेला पाहणी करायला ; एकाने काठीने डोके फोटले !!

वादळवार्ता वार्तांकन – मुबशीर खतीब

केज तालुक्यातील कोरडेवाडीच्या शिवारात पाहणी करण्याकरीता गेले असता एकाने काठीने डोके फोडुन जखमी केल्याचा प्रकार घडला आहे.

सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील सायं 5 वा सुमारास आपल्या शेतामध्ये पाहणी करण्यासाठी साधु चांगदेव यादव वय 32 वर्ष आपल्या शेतामध्ये पाहणी करण्यासाठी गेला असता शेताबाजुने असणार्‍या दगडाच्या पोवळीवरून एक ट्रक येत असताना दिसले सदरील ट्रक मध्ये पिनु अचित कोरडे ,अचित रंगनाथ कोरडे दोन्ही रा कोरडेवाडी येत होते. तेव्हा साधु यादव यांनी ट्रक पोवळीवर घालु नको दगडाची पोवळ पडेल असे म्हणाले असता पिनु अचित कोरडे याने हातातील काठीने साधु यादव यांच्या डोक्यात डाव्या बाजुस जोराने मारले तर अचित रंगनाथ कोरडे याने लाथाबुक्याने मारहान केली आणी आमच्या नादी लागल्यास तुला जिवे मारून टाकु अशी धमकी दिली .

म्हणुन साधु चांगदेव यादव याच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात पिनु अचित कोरडे ,अचित रंगनाथ कोरडे यांच्या विरुद्ध गुरनं – 500 / 2022 कलम 324 ,323,504,506,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने पोह. आघाव हे करत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!