माळेगाव /सचिन भालेराव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व इंडिया आघाडीचे ३९ बीड लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारार्थ त्याचे पुत्र सौरभ बजरंग सोनवणे यांनी गाव भेटीचा झंझावाद सुरू केला आहे ते आज गाव भेट दौऱ्याच्या निम्मिताने माळेगावला त्यांनी भेट दिली.सर्वप्रथम खंडोबा मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतले .गावातील सर्व गावकरी गट तट विसरून सौरव सोनवणे यांचे स्वागत केले.सौरभ सोनवणे यांनी गावकऱ्याशी संवाद साधला ते म्हणाले येडेश्वरी साखर कारखाना उभा करून शेतकऱ्यांना चांगला भाव दिला, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.
म्हणुन सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांच्या शब्दाला वाचा फोडण्यासाठी आपला हक्काचा, तळागाळातील कामे करणारा आपला हक्काचा माणूस संसदेत पाठवा. असे अवाहन यावेळी करण्यात आले . यावेळी मोठया संख्येने गावकरी वर्ग उपस्थित होता.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!