आपला बीड जिल्हाआपले केजविशेष
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या तत्परतेमुळे वाचला अपघातातील दिव्यांग जखमीचा जीव

स्वतःच्या खाजगी वाहनातून जखमीला पोहोचविले दवाखान्यात
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

एका दिव्यांग व्यक्तीच्या तीन चाकी वाहनाचा अपघात झाल्याने बेशुद्धावस्थेतील जखमीला केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिसात निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांच्या खाजगी वाहनातून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यामुळे जखमीचा प्राण वाचले.
या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे आज दि. ६ जानेवारी रोजी न्यायालयीन कामासाठी हिंगोली येथील न्यायालयात गेले होते. ते केजकडे परत येत असताना रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान ते केज जवळच्या तांबवा पाटी जवळ आले असताना; रस्त्यावर टाकले नवीन गतिरोधक न दिसल्यामुळे आणि तेथे फलक नसल्यामुळे दिव्यांग असलेले अमित लक्ष्मण राख रा. टाकळी यांच्या तीन चाकी स्वयंचलित वाहन (एम एच २४/ए जे ६००२) चा अपघात झाला. अपघातात अमित राख यांना मार लागल्याने ते अपघातस्थळी बेशुद्ध पडले होते. पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते यांनी ही घटना पहिली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी अमित राख यास चाटे नावाच्या एका शेतकऱ्याच्या मदतीने जखमीला त्यांच्या खाजगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयात कर्त्यावर हजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे यानी जखमींवरतात्काळ उपचार केले. जखमी अमित राख याला वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले.
या कामात त्यांना पोलीस नाईक दिलीप यांच्यासह एका चाटे नावाच्या नागरिकांनी मदत केली. या बद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, दिलीप गित्ते आणि चाटे यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून पोलीस नाईक महादेव बहिवाळ व शमीम पाशा हे देखील जखमीच्या मदतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हजर झाले. पोलिसांनी जखमीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना माहिती दिली.
अपघात ग्रस्तांना मदत करणे हे सर्वांचे प्रथम कर्तव्य :- अपघातातील जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळाल्यास जीव वाचू शकतो. म्हणून त्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस त्यांना कोणताही त्रास देत नसतात उलट अपघातात मदत करणाऱ्यांचा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान करण्यात येणार.
शंकर वाघमोडे
स.पो.नि. केज
अपघातातील जखमीला तात्काळ उपचार मिळाल्यास प्राण वाचवता येण्याची शक्यता जास्त असते आणि ती वेळ म्हणजे होल्डन अवर समजला जातो.
डॉ. भिसे
वैद्यकीय अधिकारी






