आठ दिवसात रस्ता दुरुस्त न केल्यास छावा संघटना अंदोलन करणार – शिवाजी ठोंबरे
वादळवार्ता – केज दि. २३
शासन एकीकडे रस्त्यावर करोडो रुपये खर्च करून विकासाचा डंका पिटत आहे. मात्र शहरापासून ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते अजुन किती खराब आहेत. याचे जिवंत ऊदाहरण म्हणजे उंदरी ते कुंभारवाडा मार्गे चंदनसावरगाव हा रस्ता फक्त नावालाच रस्ता म्हणून शिल्लक राहिला आहे.
प्रत्यक्षात या रस्त्याची मात्र नदी झाल्याने या भागातील जनतेला शहराराकडे जाताच येत नसल्याने नागरीकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी छावा मराठा संघटना आता आक्रमक झाली असुन येत्या आठ दिवसात हा रस्ता दुरुस्त न केल्यास संघटनेच्या वतीने अंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन केजचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील ग्रामीण भागातील शहराला जोडणारे बहुतांश रस्ते हे फक्त नावाला रस्ते आहेत. सा.बां. विभागाचे अधिकारी मुख्य रस्ते सोडुन ग्रामीण भागातील रस्त्यावर कधीच फिरकत नाहीत. त्यामुळे केज तालूक्याचा चेहरामोहरा बदलण्याची भाषा करणारे अधिकारी गुत्तेदाराला संभाळण्यात मग्न असतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने केज तालुक्यातील कित्येक रस्ते आज जलमय झाले असून या रस्त्याच्या नद्या तयार झाल्या आहेत. मग या रस्त्यावरून नागरिकांनी ये जा कशी करावी. असा गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यातच केज तालुक्यातील उंदरी ते कुंभारवाडा मार्गे चंदनसावरगाव हा रस्ता गेल्या चाळीस वर्षा पुर्वी तयार केला असुन त्यावर खडीकरण करुन झाल्यावर फक्त एकदा डांबर टाकले. मात्र तेंव्हा पासून आजपर्यंत या रस्त्याकडे कोणी डुंकूनही पाहिले नसल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रसस्त्यावरुन दुचाकी देखील निट चालवता येत नाही. हा रस्ता तालुक्याला मिळत असल्याने याच रस्त्यावरुन शाळेच्या विद्यार्थ्यांना केजला शाळेत पाण्यातूनच यावे लागते. शेतकऱ्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी याच रस्त्यावरुन खड्डयातुनच यावे लागते.तर या भागातील आजारी रुग्न, अतिदक्षता सारखे रुग्न उदा. सर्पदंश, ह्रदयविकार, अपघात असे रुग्न एवढेच नव्हे तर एखादी महिला प्रसुती साठी दवाखान्यात नेहण्याची वेळ आली. तर ति दवाखान्यात पोहचण्याच्या अगोदर वाटेतच प्रसुती होईल अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. मात्र या रस्त्याकडे ना लोकप्रतिनिधी, ना शासनाचे अधिकारी पहायला येत नाहीत. आज घडीला या रस्त्यावर खड्यातुन चालने अवघड झाले. असून या रस्त्याची खरोखर नदी झाली आहे. त्यामुळे हा रस्ता येत्या आठ दिवसात दुरुस्त करून जनतेचा हा जिवनाशी निगडित असणारा प्रश्न तात्काळ सोडवावा अन्यथा छावा मराठा संघटनेचे जिल्हा प्रमुख मा. शिवाजी (दादा) ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली केज मध्ये या भागातील जनतेला घेवुन अंदोलन करण्यात येणार असून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहिल असे संघटनेच्या वतीने केज तहसीलदार यांना दिलेल्या दिवेदनात म्हटले आहे. या बाबतचे निवेदन दि.२२ जुलै २०२३ रोजी केजचे निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी केज मा.लक्ष्मण धस यांना देण्यात आले. यावेळी छावा संघटनेचे बीड जिल्हा प्रमुख मा. शिवाजी (दादा) ठोंबरे यांचेसह सुरेश गिरी, अनिल जाधवर, अनिकेत देशमुख, प्रमोद कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!