आपला बीड जिल्हाआपले केज

विज पडून गाय ठार तर ओढ्याच्या पाण्यात म्हैस बेपत्ता

प्रतीक्षा संपली ! माळेगाव परिसरात वरुणराजाचे जोरदार आगमन नदी नाले तुडुंब भरून वाहिले

वादळवार्ता – केज

पहिल्याच पावसात विहिरी पाण्याखाली तर काही ठिकाणी शेताला आले तळ्याचे स्वरूप

मृग नक्षत्र संपून गेले तरी पाऊस हुलकावणी देत होता. शेतकरी चातकाप्रमाणे पेरणीसाठी पावसाची वाट बघत बसलेला होता. आणि थोड्याशा विलंबाने होईना केज तालुक्यातील माळेगाव सुर्डी सोनेसांगवी मांगवडगाव सुकळी गोटेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी दोन तास मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले तसेच शेतात चहूकडे पाणीच पाणी झाले असून पहिल्याच पावसात विहीर पाण्याखाली गेल्याचे दिसून आले.काही ठिकाणी शेतात आले तळ्याचे स्वरूप आले.

             बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. पेरणीसाठी शेतकरी मागच्या काही दिवसांपासून पावसाची वाट पाहत होते. अखेर आज पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून लवकर पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतामध्ये अक्षरशः पाणी साठले आहे. तर काही ठिकाणी तर शेतामधील विहिरी पहिल्याच पावसाने भरून विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत.

काही दिवसांपासून बी बियाणे खरेदी करून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होता. पेरण्या खोळंबल्या होत्या आणि जास्त दिवस पावसाने जर आखडले तर पेरण्यावर काही विपरीत परिणाम होतो की काय अशी भीती निर्माण होऊ लागलेली होती. हवामानाचे अंदाज जरी काही ठिकाणी खरे होत होते तरी अनेकवेळा पावसाचे अंदाज हे खोटे ठरत असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झालेली होती. मात्र आज वरुणराजा जोरदार बरसल्याने शेतकरी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.

वीज पडून गाय ठार पाण्यात वाहून गेल्याने म्हैस बेपत्ता

माळेगाव येथील अरुण चंद्रसेन गव्हाणे यांची त्यांच्या घराजवळ चिंचाच्या झाडाखाली बांधलेली गाय शनिवारी दि २४ रोजी झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून जागीच ठार झाली .गाभण असलेली गाय काही दिवसात व्याली असती परंतु वीज पडून गाय जागीच ठार झाल्याने अरुण गव्हाणे यांचे ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले .तर दुसऱ्या एका घटनेत मांगवडगाव येथील कल्याण गायके हे बैलगाडीतून कुटूंबीयासह घरीं परतत होते परंतु वाटेत ओढ्याच्या पाण्यात त्यांची एक म्हैस वाहून गेल्याने बेपत्ता झाली आहे. बैलगाडीतील इतर व्यक्ती एकमेकांच्या साह्याने सुखरूप बाहेर आले.तर बैलांना नागरीकांनी ओढून बाहेर काढले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!