आपला बीड जिल्हाआपले केजराजकारण
राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा केज न.प.च्या सत्ताधाऱ्यांन विरोधात विद्रोही यल्गार
आमदार , नगराध्यक्षा , तथा स्वीकृत नगसेवकांच्या हाताने 5 कोटी रुपयांच्या उद्घाटनाचा धुमधडाका तर दुसरीकडे राष्ट्रवादी च्या सहा नगरसेवकांची विद्रोही पत्रकार परिषद अनं तिसरीकडे कॉंग्रेसच्या उपनगराध्यक्षा तथा नगरसेवकांची उद्घाटन कार्यक्रमास गैरहजरी
वादळ वार्ता – केज
केज नगरपंचायत चा कारभार म्हणजे केजच्या अविकासाची अखंड मालीका, सत्तेत बसलंय कोण ? पदाधिकारी आहे कोण ? नगरपंचायत चालवतय कोण ? निधी आनतय कोण ? उद्घाटन करतय कोण ? कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही.
याबाबत सविस्तर वृत्त एकीकडे पाच कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयांत आमदार नमिता मुंदडा , अक्षय मुंदडा , नगराध्यक्षा , तथा मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले तर दुसरीकडे केज नगरपंचायतचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेत भाऊसाहेब गुंड , पाणीपुरवठा सभापती अजहर इनामदार, नगरसेवक बालासाहेब जाधव , नगरसेवक पती युनुसभाई , नगरसेवक मुस्तफा खुरेशी , यांनी केज येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन केज नगरपंचायत गलथान , ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आनला आहे. केज नगरपंचायत वतीने आज रोजी ५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटनाचा कार्यक्रम केज नगरपंचायत येथे आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते संपन्न झाला. ज्या ५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाले तो निधी सन १९ -२० चा तसेच २१-२२ जुनाच निधी असुन खा रजनीताई पाटील यांच्या ताब्यात केज नगरपंचायतची सत्ता असताना आलेला निधी आहे त्यापैकी आमदार पृथ्वीराज साठे यांनी ५० लक्ष रुपये निधी दिलेला आहे. या व्यतिरीक्त केज न .प .ला कोणत्याही स्वरूपाचा निधी प्राप्त झालेला नसुन. जुन्याच निधीवर केवळ श्रेय घेण्यासाठी यांनी चढाओढ सुरू केली आहे आणी केज शहारातील नागरीकांना फसवून उद्घाटनाचा धुमधडाका सुरु केला आहे त्यामध्ये नवनिर्वाचित आलेले मुख्याधिकारी सुद्धा यांचीच बाजु घेत आहेत आम्हाला विचारात न घेता , आमच्या नेत्यांचे पत्रीकेवर नाव न टाकता हुकुमशाही पद्धतीने कारभार चालवत आहेत. त्या बरोबरच घनकचरा व्यवस्थापना मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता , भ्रष्टाचार होत आहे . स्वच्छ पाण्याची , बोअरवेलची , बाजाराची समस्या वा इतर समस्या मोठ्या प्रमाणात असुन सत्ताधार्यांचे याकडे लक्ष नसुन फक्त जनरल फंडावर यांचा डल्ला मारणे सुरु असुन यांची तक्रार करणार असल्याचे यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले आहे.
तर तिसरीकडे मात्र सत्तेत सहभागी असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या उपनगराध्यक्षा शितलताई दांगट याच्या सह नगरसेवक देखील उद्घाटन कार्यक्रमास गैरहजर होते.
या वरून पुढील काळात सत्तेची समीकरणे बदलून नव्या सत्तेचा प्रारंभ होतो कि काय अशी चर्चा केज शहर तालुक्यात होत आहे.
ठळक घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा नगसेवकांचा उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार आणी निषेध
कॉंग्रेसच्या उपनगराध्यक्षा सह नगरसेवक उद्घाटन कार्यक्रमास गैरहजर
केज नगरपंचायतची सत्ता भाजपात विलीन होण्याची शक्यता.