वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज-बीड रोडवर मस्साजोग येथील हॉटेल समोर एका उभ्या कारला मालवाहू पिकअप रिक्षाने पाठीमागून धडक दिली. यात कारचे नुकसान झाले परंतु सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.
केज-बीड रोडवर केजकडे येणारी टोयाटो ग्लान्झा (एम एच २०/एफ जी- ५४९१ ) ही कार मानसी हॉटेल समोर उभी असताना; त्या गाडीला पाठी मागून येणारी मालवाहू पिकअप रिक्षा (एम एच-२३/ए यु-२५६१) याने जोराची धडक दिली यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात दुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघाता नंतर दोन्ही वाहने केज पोलीस ठाण्यात आणली असून या अपघात प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात येत आहे.