आपले केजनैसर्गिक

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी शेतकर्‍यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा म्हणुन दिले पहिले निवेदण…

वादळवार्ता – केज

केज मतदारसंघात पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीने तसेच वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत सरकारने तातडीने पावले उचलत मदत जाहीर करावी यासाठी केज तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यात आले .

याबाबत सविस्तर वृत्त केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री,नांदूरघाट,शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव ढोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव,युसुफवडगाव,धनेगाव, कोरेगाव, कोठी,मस्साजोग, चिंचोली माळी,देवगाव,सुर्डी,सोनेसांगवी, येथे नैसर्गिक वातावरण बदल झाल्याने काल दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व गारपीट झालेली आहे.सदरील झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील उभ्या पिकांचे,फळभागाचे, भाजीपाला,आंबा,टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी गहू व अन्य मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

तसेच वीज पडल्याने केज तालुक्यातील देवगाव,हंगेवाडी व मांगवडगाव येथे तीन ठिकाणी वीज पडून पाच जनावरे दगावले आहेत.तरी सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.यासाठी आज तहसील कार्यालय केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.लवकरात लवकर मदत जाहीर न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाव्दारे देण्यात आला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!