केज विधानसभानिवडणुक

केज विधानसभा मतदारसंघात डॉ. प्रितमताई मुंडे यांचा झंझावाती दौरा

नमिता मुंदडा यांना दिलेले प्रत्येक मत पंकजाताईंचे बळ वाढवणारे

आपल्या हक्काची सत्ता आणण्यासाठी महायुतीला विजयी करा ; प्रितमताईंचे मतदारांना आवाहन

केज । प्रतिनिधी

राज्यात आपल्या हक्काची असलेली महायुतीची सत्ता आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या पाठीशी मतदानरुपी आशीर्वाद उभे करा, त्यांना दिलेले प्रत्येक मत हे पंकजाताई मुंडे यांचे बळ वाढवणारे आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून पुढचे पाच वर्षे मतदार संघाची इमाने इतबारे अविरत सेवा करू अशी ग्वाही माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मतदारांना दिली. केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील प्रचार दौऱ्यानिमित्त विविध गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

केज विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारानिमित्त डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सलग दोन दिवस झंझावाती दौरा करत मतदारसंघ पिंजून काढला. यादरम्यान ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यादरम्यान उपस्थित होते.

होत असलेली विधानसभा निवडणुक ही दुरगामी परिणाम करणारी आहे. आपल्याला केवळ आपला प्रतिनिधी निवडायचा नसून येणाऱ्या पिढीचे भवितव्य घडवणारा, त्यांच्या भवितव्याला योग्य दिशा देणारा हक्काचा आमदार आपल्याला निवडायचा असल्याचे डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या. राज्यातील सर्वसामान्यांच्या हितासाठी लाडकी बहीण, वीज बिल माफी, मोफत अन्नधान्य’ अशा विविध लोकोपयोगी योजना राबवणारे महायुतीचे सरकार आपल्याला पुन्हा एकदा सत्तेत आणायचे आहे, आणि म्हणून आपल्या हक्काचा उमेदवार आणि हक्काची सत्ता आणण्यासाठी, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार विधानसभेत पाठवा, येणारे पाच वर्षे आपल्या विकासाचे आणि उज्वल भवितव्याचे असतील.मागील पाच वर्षांपासून आम्ही या मतदारसंघासाठी प्रामाणिकपणे काम करत आहोत, पुढील काळात देखील आपल्या सेवेत खंड पडू देणार नाही अशी ग्वाही सर्वांना देते’ अस डॉ. प्रितमताई मुंडे आपल्या भाषणादरम्यान म्हणाल्या.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!