वादळवार्ता वार्तांकन – केज
आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कल्पनेतुन महाराष्ट्रामध्ये दि.२६.०९.२०२२ ते दि.०५.१०.२०२२ या कालावधी मध्ये “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानामध्ये १८ वर्षेवरील महिला,बालके व गरोदर माता यांना पुर्णपणे मोफत सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये संपुर्ण कालावधी मध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र टाकळी, केज जि.बीड येथे ही सेवा देण्यात येणार असून सदर अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. उदय धाट यांनी केले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक टाकळी गावचे सरपंच शिवराम घुले यांनी केले.
सदर अभियानात स्त्रीरोग तज्ञांमार्फत गरोदर महिलांची तपासणी,गरोदर महिलांची शारीरीक तपासणी.(यामध्ये वजन,रक्तदाब, हिमोग्लोबीन,रक्तगट),सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्यां, होणार आहेत तरी मोफत तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ . उदय धाट , अरोग्य सहाय्यक सतीश मोराळे यांनी केले आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!