आपला बीड जिल्हा

प्रतिबंधित गायरान जमिनीत मागास प्रवर्गातील भूमिहीनांनी अतिक्रमण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल !

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

केज तालुक्यातील लाडेगाव येथील प्रतिबंधित सरकारी गायराण जमिनीत प्रवेश करण्यास मनाई आदेश असताना प्रवेश करून गायरान जमिनीत मशागत करणाऱ्या मागास प्रवर्गातील पाच भूमिहीनांच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, लाडेगाव ता. केज येथील सरकारी गायरान जमीन सर्व्हे नं. १४३ मधील २९.९२ हेक्टर जमीन ही उपविभागीय दंडाधिकारी अंबाजोगाई यांचे आदेश क्र. २०२२/एमएजी/१४४/ सीआरपीसी /कावि दि. ३०/०६/२०२२ अन्वये मौजे लाडेगाव ता. केज मधील गायरान जमीन स. नं. १४३ मधील २९.९३ हे. आर. क्षेत्र ग्रामपंचायत लाडेगाव यांच्याकडे देखभालीसाठी ताब्यात देण्यात आले होते. सदर गायरान जमीनी वरून लाडेगाव येथील जगजिवन विठ्ठल आंबाड व इतर आणि अतिक्रमण धारक रामधन बाबाजी धिरे व इतर यांच्यात भांडण तंटे होवुन एकमेकां विरूध्द पोलीस ठाणे युसुफवडगाव येथे गु. र. नं. १२२/२०२१ भा दं वि ३०७, ३९५, ३२३, ५०४, ५०६ आणि गु. र. नं. १२३/२०२१ ३०७ ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ सह ॲट्रॉसिटीचे कलम ३ (१) (आर) (एस), ३ (२) (५) ) प्रमाणे परस्पर विरोधी गुन्हे नोंद करण्यात आले होते.

या गायरान जमीनी वरून एखादा उद्रेक होवुन समाजाची शांतता धोक्यात येण्याची शक्यता नाकारतात येत नाही. त्यामुळे फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी अंबाजोगाई यांनी लाडेगाव ता. केज येथील गायरान स. नं. १४३ मध्ये या आदेशान्वये पुढील अनिश्चीत कालावधी करिता फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ (३) अन्वये सदर गायरान जमीनीत प्रवेश करण्यास मनाई आदेश लागु केला होता.

त्या आदेशाचे अनुषंगाने तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी साहेब केज यांनी त्यांचे आदेश जा. क्र. २०२२/जाम २/ लाडेगाव /अतिक्रमण / कावी-८४५ दि. २१/०७/२०२२ अन्वये मौजे लाडेगाव ता. केज येथील गायराण जमीन गट नं. १४३ मध्ये सध्या कलम १४४ (३) असुन सदरील आदेशाचे कोणत्याही व्यक्ती कडुन उल्लंघन होत असल्यास सदर व्यक्ती विरुध्द कायदेशिर कार्यवाही करून तात्काळ करण्यात यावी. सदर कामी कोणताही निष्काळजीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर राहील. असे एका आदेशान्वये ग्रामसेवक श्रीकांत कांबळे यांना प्राधिकृत करण्यात आले होते.

दि. २५/०७/२०२२ रोजी १:३० वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक यांच्या सोबत लाडेगाव सज्जाचे तलाठी पटाईत व्ही. जी., ग्रामपंचायत शिपाई मुस्तफा अश्रफ शेख यांचेसह गायरान स. नं. १४३ मध्ये पाहणी करण्यासाठी गेले असता तेथे रावसाहेब एकनाथ धिरे, बालासाहेब बाबाजी धिरे, मोहन रोहीदास धिरे, भिमा रोहीदास धिरे आणि अंकुश दादाराव धिरे सर्व रा. लाडेगाव ता. केज जि. बीड यांनी प्रतिबंधीत क्षेत्र स. नं. १४३ मध्ये जावुन सदर जमीनीची मशागत करून साफसफाई करतांना आढळुन आले. उपविभागीय दंडाधिकारी साहेब अंबाजोगाई यांचे आदेश क्र. २०२२/ एमएजी/१४४/ सीआरपीसी/ कावि दि . ३०/०६/२०२३ अन्वये लागु केलेले कलम १४४ (३) भारतीय दंड प्रक्रीया संहिता या आदेशाचे उल्लघंन केले. म्हणुन ग्रामसेवक श्रीकांत कांबळे यांच्या फिर्यादी वरून गु र नं १०८/२०२२ भा. दं. वि. १८८ आणि ४४७ नुसार रावसाहेब एकनाथ धिरे, बालासाहेब बाबाजी धिरे, मोहन रोहीदास धिरे, भिमा रोहीदास धिरे आणि अंकुश दादाराव धिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुपारे हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!