आपला बीड जिल्हा
केज सार्वजनिक स्मशानभुमीमध्ये वृक्षलागवड , वृक्षसंवर्धन , विकासाचा एक शाप ? भाग चार
सार्वजनिक स्मशानभुमी केज मध्ये नगरपंचायतने लागवडीकरिता आनलेले असंख्य रोपटे होतील का वटवृक्ष ?
सार्वजनिक स्मशानभुमी केज मध्ये केज नगरपंचायतने लागवडीकरिता आनलेले असंख्य रोपटे होतील का वटवृक्ष ?
सार्वजनिक स्मशानभूमीत वृक्ष लागवडीकरिता केलेले खड्डे रिकामेच ; खड्डे , वृक्षलागवडीची वाट पाहतात कि काय अशीच परिस्थिती
वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या विकासासाठी केज नगरपंचायतची उदासीनता दिसुन येत आहे .
सार्वजनिक स्मशानभुमीच्या बातम्या प्रकाशीत होऊन देखील केज न.प. चे सुस्त प्रशासन कोणत्याही प्रकारे हालचाल करत असताना दिसत नाहीत वा आजपर्यंत कोणतीही विकासकामे स्मशानभूमीमध्ये झालेले नाहीत किंवा हाती घेतली गेली नाहीत.
प्रत्येक वर्षी शासनाचा मोठा निधी विकासासाठी येतो , मात्र विकास कागदावरच करण्यासाठी तथा थातुर – मातुर कामे करण्यासाठी कांही पुढारी अंतोनात परिश्रम करतात आणी विकास कुठेतरी टक्केवारीत लुप्त होतो.
अशीच परिस्थिती सध्या केज नगरपंचायत हद्दीमध्ये येत असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीची झालेली आहे.
ज्या ठिकाणी झाडे लावण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी झाडे लावने गरजेचे असताना मात्र वेगळ्याच ठिकाणी झाडे लावली जातात .
आजच्या आधुनिक युगात वृक्षसंवर्धन आणि लागवड ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था, शासकीय आस्थापने, नागरिक, बिगर शासकीय संस्था या वृक्षलागवड करताना दिसून येतात. तसे शासनाचे पत्रक आहे . यासाठी मोठा निधी येतो ; मात्र केज नगरपंचायत ची वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेले असंख्य रोपटे हे लावण्यावाचून स्मशानभुमीमध्ये वाळुन गेलेली आहेत . त्यांना लावण्यासाठी स्मशानभूमीत खड्डे केले गेले परंतु रोपटे खड्ड्यापर्यंत गेले नाहीत किंवा खड्डयापर्यत नेण्याकरिता केज नगरपंचायत उदासिन आहे .
केजच्या नागरीकांनीच आता विकासाची मालीका हाती घेतली आहे .जलप्रदुषनाला टाळण्यासाठी मृतव्याक्तिची रक्षा पाण्यामध्ये न टाकता केज सार्वजनिक स्मशानभुमीमध्येच रक्षा विसर्जीत करून त्याठिकाणी वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली आहे . केज सार्वजनिक स्मशानभुमीमध्ये रक्षा सावडण्याकरिता आलेल्या नागरीकांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम देखील सुर केला गेला आहे .
मात्र केज नगपंचायत चे मुख्याधिकारी तथा केजचे नेतेगण सार्वजनिक स्मशानभुमी च्या समस्याकडे डोळे बंद करून पहात आहेत .
त्यामुळे असेच म्हणावे लागेल कि सार्वजनिक स्मशानभुमी केज मध्ये नगरपंचायतने लावण्याकरिता आणलेले असंख्य रोपटे होतील का वटवृक्ष ? कि शाप आहे वृक्ष लागवडीचा,वृक्षसर्वधनाचा ? का फक्त कागदोपत्रीच कामांची बिले उचलली जातील . हा केज शहरातील आठरापगड जातीला पडलेला प्रश्न आहे .
********************************************