वादळवार्ता/बीड
मराठवाडयातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने दि. ११ ऑक्टोबर ते दि. २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्हयांमध्ये भेट देवून बैठक घेणार आहेत. सदर समिती बीड जिल्हयात दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी भेट देवून सकाळी ११ ते दुपारी ०१ या कालावधीत अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून दुपारी ०२ ते ०३ या वेळेत जनतेची निवेदने व पुरावे स्विकारणार आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावे.
असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!