आपला बीड जिल्हाआपले केज

केज मधील दुर्दैवी घटना;खदानीत बुडून बहिण-भावाचा तर वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा एकुण तिघांचा मृत्यु.

सर्वत्र होतं आहे हळहळ

वादळवार्ता/ गौतम बचुटे

 दसऱ्या निमित्त कपडे धुण्यासाठी गेलेली दोघे सख्खे बहीण भाऊ पाण्यात बुडत असताना त्यांना वाचा वाचयला गेलेल्या आईचा आरडा ओरडा एकूण शेजारी असलेला तरुण त्यांना वाचवायला गेला परंतु दुर्दैवाने दोघे बहीण भाऊ आणि युवक अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दि. १४ ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी केज तालुक्यातील केज शहरातील गणेश नगर भागातील वाघमारे व घोडके हे शेजारी राहात असलेली दोन्ही कुटुंबे ही दुसऱ्या निमित्त कपडे धुण्यासाठी केज-बीड रोडवरील रमाई नगरच्या तिरुपती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवून झाल्या नंतर दुपारी ४:०० च्या सुमारास त्यावेळी रोहित गजानन वाघमारे – ११ वर्ष,वैष्णवी गजानन वाघमारे वय १२ वर्ष आणि सोमेश्वर गजानन वाघमारे १५ वर्ष हे पाण्यात बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी त्यांची आई आशा गजानन वाघमारे ही आक्रोश करून त्यांना वाचविण्यासाठी स्वतः पाण्यात उतरली तिचा आरडा ओरडा ऐकून शेजारी असलेला अविनाश संतोष घोडके वय १८ वर्ष याने पाण्यात उडी घेतली त्याने उषा गजानन घोडके हिला व रोहित गजानन वाघमारे यांना वाचविण्यात यश आले मात्र त्याने सोमवश्वर व वैष्णवी यांना वाचावीत असताना खदानीतील पाण्यात बुडून त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत वैष्णवी व सोमेश्वर या दोन सख्ख्या बहीण भावा बरोबरच त्यांना वाचवायला गेलेल्या अविनाश घोडके याचाही मृत्यू झाला.

दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या देशा वरून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस जमादार श्रीकांत चौधरी, पोलीस जमादार बाळासाहेब अहंकारे, त्रिंबक सोपने, मतीन शेख, माळी व तलाठी साहिल इनामदार हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी लोकांच्या मदतीने प्रेत पाण्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.

आई अन एक मुलगा वाचला पण मुले काळाने हिरावली अन वाचविणारही प्राणाला मुकला ! :-

उषा घोडके ही तिच्यात मुलांना वाचावीत असताना तीला वाचविण्यात अविनाश वाघमारे याला यश आले पण दुर्दैवाने वैष्णवी व सोमेश यांचा जीव वाचावीत असताना अविनाश वाघमारे याचाही जीव गेला.

मयत तिघेही सामान्य कुटुंबातील :- वैष्णवी व सोमेश्वर वाघमारे यांचे वडील हे बुट चप्पलचे काम करीत आहेत तर अविनाश घोडके यांचे उमरी रोड लगत सुतार कामाचे दुकान आहे ही दोन्ही कुटुंबे अत्यंत सामान्य असून वसंत महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या गणेश नगर भागात ते राहात होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!