प्रत्येक गावातील नागरिकांनी लिंकेज कॅम्प मध्ये सहभागी होऊन विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे…सरपंच गायकवाड (आनंदगाव सारणी)
वादळवार्ता – केज
केज (प्रतिनिधी) दि २५ रोजी केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथे भारतीय रिजर्व बँक, बँक ऑफ महाराष्ट्रा व क्रिसिल फाउंडेशन यांच्या माध्यमातून चालणाऱ्या मनी वाईज वित्तीय साक्षरता केंद्र, वडवणी यांच्या विद्यमाने महाराष्ट्र ग्रामीण बॅंक युसूफ वडगाव यांच्या सहकार्याने गावांमध्ये विवीध योजनांच्या माध्यमातून लिंकेज कॅम्प आयोजित करण्यात आला होता..
सदरील माहिती अशी की, केज तालुक्यातील विविध गावांमध्ये मनीवाइज वित्तीय साक्षरता केंद्र यांच्या वतीने बॅंकाच्यां विविध योजना ग्रामीण भागातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी व योजनांची जनजागृती करण्यासाठी केज तालुक्यात काम चालू आहे. केज तालुका समन्वयक घाडगे रंजीत यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे. तरी शासनाच्या व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विविध योजना लिंकेज कॅम्पच्या माध्यमातून गावातच लोकांना मिळवून दिल्या जातात. या मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, मुद्रा लोन योजना तसेच विविध योजना राबविण्यात येतात.आज गावांमध्ये क्रिशील फाउंडेशन यांच्या वतीने मनीवाइज वित्तीय साक्षरता केंद्र, ग्राम उर्जा फाउंडेशन, आरोग्य अभियान यांच्या माध्यमातून गावात ईश्रम कार्ड, महा डिबीटी, आयुष्यमान भारत योजना,व इतर काढण्यात आले. या कार्यक्रमासाठी सेंटर मॅनेजर ऋषिकेश टाकणखार, केज तालुका समन्वयक रंजित घाडगे, ग्राम उर्जा फाउंडेशन समन्वयक इंगोले सर, आरोग्य मित्र मुंडे सर, साखरे सर, गव्हाणे सर , बॅंक बी सी गायकवाड तुकाराम सर, व गावातील सरपंच गोविंद गायकवाड, उपसरपंच शंकर शिंदे, ग्रामपंचायत कार्यालय येथील पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!