आपले केज

राजर्षी शाहू शाळेत सावित्रीबाई फूले जयंती उत्साहात साजरी..

शाळा छोट्या सावित्रींनी गजबजली..

वादळवार्ता वार्तांकन – केज

स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी.यांची तर प्रमुख वक्ते म्हणून शाळेतील शिक्षक श्री.डापकर एस.ए.व श्री.चौधरी बी.डी.यांची उपस्थिती होती.ज्या माऊलीमुळे लेकींना शिक्षणाची दारे खुली झाली त्या सावित्रीबाई फूले यांना शाळेतील मुलींनी त्यांच्याप्रमाणेच वेशभुषा करून अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी.यांनी प्रतिमापुजन केले.

   कार्यक्रमा निमित्त आयोजित भाषण स्पर्धेत शाळेतील छोट्या “सावित्री”म्हणजेच विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी लहान गटात कु.शिंदे प्राची सुरेंद्र प्रथम,कु.मिसाळ वैष्णवी नंदुलाल द्वितीय तर चि.देशमुख ओमकार सचिन याने तृतीय क्रमांक पटकावला तर मोठ्या गटात चि.बेडसकर शिवम सुग्रीव प्रथम,कु.जाधव संस्कृती भारत द्वितीय तर कु.केदार साक्षी रामेश्वर हिने तृतीय क्रमांक मिळवला यावेळी परिक्षक म्हणून श्री.मस्के जे.आर.व श्री.डिरंगे जी.बी.यांनी काम पाहिले.

   प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या जीवनातील प्रसंग सांगुन त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला,प्रतिकुल परिस्थिती मध्ये समाजाला सकारात्मक दिशेने नेण्यासाठी सावित्रीबाई यांचे योगदान त्यांनी सांगितले.

  अध्यक्षीय भाषण करताना श्रीमती चाटे म्हणाल्या सावित्रीबाई केवळ महिलांना शिक्षण देऊन थांबल्या नाहीत.त्यांना सक्षम,धाडसी करण्‍यासाठी विविध रूढी परंपरांचा नायनाट करण्‍याचे कामही त्‍यांनी केले.

  कार्यक्रमाचे सुञसंचलन श्री.क्षीरसागर आर.एस.यांनी तर आभार श्री.देशमुख ए.डी.यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.यादव व्हि.बी.यांनी मोलाचे सहकार्य केले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!