वादळवार्ता वार्तांकन – केज
सविस्तर वृत्त असे कि केज शहरामध्ये मंगळवार पेठ कॉर्नर रोडच्या उत्तरबाजुस पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना गावठी (हातभट्टी ) दारू विकत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन पाहीले असता एक महिला राहणार भवानी चौक,धारूर रोड केज हि विनापरवाना अवैद्यरित्या गावठी तयार दारू विक्री करताने आढळुन आली.
तिच्याकडुन अंदाजे पंचेवीस लिटरचे दोन प्लास्टीकचे कँन्ड प्रति लिटर 50 रुपयांप्रमाणे 1250 रुपये व प्रती कँन्ड किमती 100 रुपये एकुण 200 रुपये असा एकुण 1450 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोना. श्रीकांत रामराव चौधरी यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात महिले विरुद्ध गुरन.474/2022 प्रमाणे कलम 65 ई म. दा.का. प्रमाणे केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.