वादळवार्ता – केज
पत्रकारितेमध्ये सुरुवातीपासुनच सकारात्मकता विचारांचा प्रभाव असणारे त्या सोबतच आदर्श व्यापार करणारे महादेव दळवे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा लेख
केज तालुक्यातील चिंचोली माळीचे भूमिपुत्र महादेव दळवे यांना वयाच्या २० व्या वर्षी त्यांना पित्तशोक झाला त्यांनतर सुरु त्यांचा संघर्षमय प्रवास . वडिलांचे छत्र हरपल्या नंतर महादेव हळवे हे औरंगाबाद येथे बजाज अॅटो कंपनीमध्ये कामाला गेले. तेथुन सरळ एल एन टी कंपनी मुंबई येथे कंपनीत रुजू झाले . त्याही ठिकाणी त्यांचे मन रमले नाही म्हणुन त्यानी ते काम सोडुन टाटा मोटार्स पुणे येथे कांही काळ नौकरी केल्यानंतर औष्णीक विद्युत केद्र परळी येथे कांही काळ सेवा केली परंतु स्व:ताचा व्यवसाय करावा हे स्वप्न त्यांना सारखे सतावत होते. म्हणुन त्यांनी तेही काम सोडुन मातृभुमी जवळ करण्याचे ठरवले . गावी आल्या नंतर त्यांचे बंधु बाबुराव दळवे यांच्या मार्गदर्शना खाली यांनी त्यांना व्यवसाया करिता भांडवल उपलब्ध करुण प्रोत्साहान दिले. त्या भांडवलाच्या आधारे त्यांनी स्वःताचा व्यवसाय सुरु केला त्याचे नाव श्री साई फटाके ॲन्ड फर्नीचर असे ठेवल्यानंतर त्यांनी मागे वळुन पाहिले नाही आज ते फटाके व्यवसायात सर्वदूर परिचित आहेत.
या व्यवसायात त्यांचे बंधू बाबुराव दळवे यांचे वारंवार मार्गदर्शन घेऊन ते व्यापार सांभाळत असतात.सामाजिक कार्यातून वारंवार आन्नदान, सामाजीक उपक्रम राबवत असतात त्यांचे वडील कै. पांडुरंगराव दळवे यांच्या स्मृती प्रित्यार्थ विविध उपक्रम त्यांचे बंधू बाबुराव दळवे व कुटुंबीय यांच्यामार्फत राबवले जातात
त्यांचे कुटुंब संपूर्ण सुशिक्षित असुन कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धती २१ व्या शतकात पहावयास मिळते. त्या बरोबरच त्यांनी सामाजीक व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारी न्यायिक , सकारात्मक पत्रकारिता दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून न्याय देण्याचे काम केले आहे.
आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना या लेखाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!